शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार?; I.N.D.I.A की NDA ची पुढील राजकीय वाटचाल ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 05:40 IST

राजस्थानात १९९ जागांसाठी १८६२ उमेदवार रिंगणात होते. तिथे ७५.४५ टक्के मतदान झाले होते.

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिझोराम वगळता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत रविवारी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण झाली असून, निकालाकडे सर्वपक्षीय उमेदवारांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये, तर तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. 

इंडिया की एनडीए? अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर होणाऱ्या या निकालामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आणि सत्ताधारी ‘एनडीए’ आघाडीची पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे.

तेलंगणात बीआरएस की काँग्रेस? तेलंगणात बीआरएस सरकार हॅटट्रिक करते की काँग्रेस सहा हमी योजनेची जादू दाखविते, ते निकालानंतर स्पष्ट होईल. प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव, त्यांचे पुत्र के.टी.रामाराव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डींचा समावेश आहे.

राजस्थानात कोण मारणार बाजी? राजस्थानात १९९ जागांसाठी १८६२ उमेदवार रिंगणात होते. तिथे ७५.४५ टक्के मतदान झाले होते. राज्यात सत्तारूढ काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुकाबला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून दर विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन होते ही परंपरा आहे. यंदा काय होणार, याबाबत उत्सुकता आहे.

‘एमपी’त अधिक मतदान कुणाच्या पथ्यावर? मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर रोजी २३० विधानसभा मतदारसंघांत मतदान झाले होते. राज्यात विक्रमी ७७.८२% मतदान झालेले आहे. २०१८ च्या निवडणुकीच्या तुलनेत ते २.१९ टक्के अधिक आहे. ते कुणाला फायदेशीर ठरेल किंवा कुणाला त्याचा फटका बसेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

छत्तीसगडमध्ये १,१८१ उमेदवारांचा निकालछत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील ७६.३१ टक्के मतदान झाले होते. मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टी.एस.सिंहदेव, माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

सध्याची स्थिती

राजस्थान  -  कॉंग्रेस - अशोक गेहलोतमध्य प्रदेश - भाजप -  शिवराज सिंह चौहानछत्तीसगड - कॉंग्रेस - भूपेश बघेलतेलंगणा - बीआरएस - के. चंद्रशेखर राव

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३