शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

वाळवंटातील लढतीत काेण मारणार बाजी? कृषी मंत्र्यांसमोर तगडे आव्हान  

By विलास शिवणीकर | Updated: April 14, 2024 08:22 IST

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यापुढे यंदा तगडे आव्हान आहे. 

विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : राजस्थानच्या बाडमेरमध्ये तापमान भलेही ४२ अंशांच्या पुढे गेलेले आहे. पण, त्यापेक्षा अधिक तापले आहे ते इथले राजकारण. भाजपचे विद्यमान खासदार, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी हे पुन्हा मैदानात आहेत. तर, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीतून आलेले उम्मेदाराम बेनीवाल यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. येथून अपक्ष आमदार रवींद्रसिंह भाटी यांनी रिंगणात उतरून लढत तिरंगी केली आहे.

बाडमेर हा राजस्थानातील तिसरा सर्वांत मोठा जिल्हा आहे. भाजपने यंदा पुन्हा कैलाश चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. आमदार ते खासदार आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री, असा त्यांचा यशाचा चढता आलेख आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे ते राजस्थानचे अध्यक्ष राहिलेले आहेत. मात्र, यंदा त्यांच्यासाठी ही निवडणूक आव्हान बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केलेल्या विकास कामांमुळे मतदार आपल्याला कौल देतील, असा त्यांना विश्वास आहे. 

काँग्रेसचे उमेदवार उम्मेदाराम बेनीवाल हे मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बायतू मतदारसंघातून केवळ ९१० मतांनी पराभूत झाले होते. काँग्रेस पक्षाचे तिकीट आणि त्यांचा जनसंपर्क या जोरावर ते तगडे उमेदवार म्हणून समोर आले आहेत. रवींद्रसिंह भाटी (२६) यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत शिव मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजयही मिळविला होता.  रवींद्रसिंह भाटी यांनी लोकसभेसाठी ४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे 

  1. अपक्ष उमेदवार रवींद्रसिंह भाटी यांच्या उमेदवारीचा आपल्याला फायदा होईल, असे काँग्रेसला वाटत आहे. तर, भाटी यांना रोखण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. या मतदारसंघात मागासवर्गीय मतदारांची संख्या निर्णायक आहे.
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच येथील जाहीर सभेत स्पष्ट केले की, आमच्यासाठी संविधान हेच सर्वस्व आहे. या माध्यमातून मागासवर्गीय मतदारांना आपलेले करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
  3. पाण्याची समस्या आणि बेरोजगारीचा मुद्दाही येथे चर्चिला जात आहे. पर्यटनालाही येथे पाहिजे तशी चालना मिळालेली नाही.

एकूण मतदार    २२,०६,२३७पुरुष - ११,७६,९७५महिला - १०,२९,२५३

२०१९ मध्ये काय घडले?कैलाश चौधरी भाजप (विजयी) ८,४६,५२६मानवेंद्र सिंह काँग्रेस, (पराभूत) ५,२२,७१८

२०१९ पूर्वीची परिस्थिती वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     २०१४ सोनाराम चौधरी     भाजप     ४,८८,७४७२००९ हरीश चौधरी     काँग्रेस     ४,१६,४९७२००४ मानवेंद्र सिंह     भाजप     ६,३१,८५११९९९ सोनाराम चौधरी     काँग्रेस     ४,२४,१५०

टॅग्स :Rajasthanराजस्थानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४