शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:05 IST

जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप जवळपास २ वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे ते देशाचे सहावे उपराष्ट्रपती बनले आहेत. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर, 19 सप्टेंबरपूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. मात्र यावरून, राजकीय वर्तुळात विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धडखड यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवला. महत्वाचे म्हणजे, जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप जवळपास २ वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे ते देशाचे सहावे उपराष्ट्रपती बनले आहेत. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर, 19 सप्टेंबरपूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक आहे.

धनखड यांच्यानंतर कोण सांभाळणार कामकाज? -जेव्हा उपराष्ट्रपती पद रिक्त असते तेव्हा राज्यसभेच्या अध्यक्षांचे काम थांबत नाही. संविधानाच्या कलम ९१ नुसार, राज्यसभेच्या उपाध्यक्षांना तात्पुरत्या स्वरुपात अध्यक्षांचे काम पाहण्याचा अधिकार आहे. अर्थात कोणत्याही कारणास्तव उपराष्ट्रपती पद रिक्त झाले तर राज्यसभेचे उपाध्यक्ष अध्यक्षांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. संविधान त्यांना हा अधिकार देते.

19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणे का आवश्यक? - उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा म्हणजे आता नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार. संविधानाचे कलम ६३ ते ७१ आणि उपराष्ट्रपती (निवडणूक) नियम १९७४ मध्ये उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. यानुसार, धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून ६० दिवसांच्या आत अर्थात १९ सप्टेंबर २०२५ पूर्वी ही निवडणूक होणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरच होऊ शकते. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्य मिळून उपराष्ट्रपतीची निवड करतात. 

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडRajya Sabhaराज्यसभा