शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स घालून लग्न मंडपात आलेल्या मुलीशी कोण लग्न करेल? - सत्यपाल सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 12:56 IST

ज्या मुलीची लग्नाच्या विधी जीन्स पँट घालून करण्याची इच्छा असेल, तिच्याशी कोणताही मुलगा लग्न करणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केलं आहे.

गोरखपूर - ज्या मुलीची लग्नाच्या विधी जीन्स पँट घालून करण्याची इच्छा असेल, तिच्याशी कोणताही मुलगा लग्न करणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये महाराणा प्रताप शिक्षा परिषदेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात सत्यपाल सिंह बोलत होते. यावेळी मंचावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही हजर होते. यावेळी त्यांनी मुक्तफळं उधळलीत. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, एखादी व्यक्ती जीन्स घालून मंदिराचा महंत होण्याची भाषा करत असेल तर, लोक त्याला स्वीकारतील का? ही गोष्ट लोकांच्या पचनी पडणार नाही. इतकेच काय एखादी मुलगी स्वत:च्या लग्नातील विधींच्यावेळी जीन्स घालून बसणार असेल तर किती मुलांना अशा मुलीशी लग्न करावेसे वाटेल, असा सवाल सत्यपाल सिंह यांनी विचारला. 

 

दरम्सयान, त्यपाल सिंह 1980 च्या बॅचमधील महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.   2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिन्यातच त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात जागा मिळाली.