केंद्र सरकारने भारताचे पुढील सरन्यायाधीशांचे नाव जाहीर केले. न्यायमूर्ती सूर्यकांत हे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश बी.आर. गवई २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील आणि न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर याबाबत एक पोस्ट केली. "भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती २४ नोव्हेंबर २०२५ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करताना आनंदित आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो."
सीजेआय गवई यांनी पुढील सीजेआय म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव केंद्र सरकारकडे शिफारस केले होते. सध्याच्या सीजेआयनंतर सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती सूर्यकांत हे २३ नोव्हेंबर रोजी सीजेआय गवई यांच्या निवृत्तीनंतर २४ नोव्हेंबर रोजी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होतील. या वर्षी १४ मे रोजी शपथ घेतलेल्या सीजेआय गवई यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे पुढील सीजेआय म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती.
'भारताचे माननीय सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून माननीय न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव शिफारस करतात." २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळालेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा सरन्यायाधीश म्हणून सुमारे १५ महिने कार्यकाळ असेल. ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होणार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.
Web Summary : Justice Surya Kant will be the next Chief Justice of India, succeeding CJI B.R. Gavai on November 24, 2025. Law Minister Arjun Ram Meghwal announced the appointment, following Gavai's recommendation. Justice Surya Kant will serve for approximately 15 months.
Web Summary : जस्टिस सूर्यकांत भारत के अगले मुख्य न्यायाधीश होंगे, जो 24 नवंबर, 2025 को सीजेआई बी.आर. गवई का स्थान लेंगे। कानून मंत्री अर्जुन राम मेघवाल ने गवई की सिफारिश के बाद नियुक्ति की घोषणा की। जस्टिस सूर्यकांत लगभग 15 महीने तक सेवा करेंगे।