शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:41 IST

Vice Presidential Election: भाजपाच्या एनडीएमधील मित्रपक्षांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले आहेत. त्यानुसार आज हे दोघेही एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करतील, असे सांगण्यात येत आहे.

जगदीप धडखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्याने निवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपाने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निवडण्यासाठी विचारमंथन सुरू केलं आहे. तर भाजपाच्या एनडीएमधील मित्रपक्षांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले आहेत. त्यानुसार आज हे दोघेही एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करतील, असे सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी भाजपामधील काही नेत्यांच्या नावांची माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे.

प्रसारमाध्यांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार जगदीप धनखड हे जाट समाजातील होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे या समाजात नाराजी आहे. त्यामुळे धनखड यांचा उत्तराधिकारी म्हणून जाट समुदायातील नेत्यालाच प्राधान्य दिलं गेलं तर गुजरातचे राज्यपाल आचार्च देवव्रत यांना भाजपाकडून संधी दिली जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. जगदीप धनखड हे राजस्थानमधील जाट समाजातील होते. तर आचार्य देवव्रत हेसुद्धा जाट समाजातील असून, ते हरयाणामधील आहेत.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार  आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतिपदासाठी आज एनडीएकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली  उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना एनडीएचा उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार देण्यात आले होते. या बैठकीला एनडीएमधील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीj. p. naddaजे. पी. नड्डा