शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार?, कार्यकारिणीच्या बैठकीला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 20:46 IST

राहुल गांधी यांनी 25 मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसला आज नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी कोणाचीही निवड करण्यात आली नाही. दरम्यान, आज  काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत नवीन अध्यक्ष पदाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी अनेक काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात दाखल होत आहे. 

राहुल गांधी यांनी 25 मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. तसेच, गांधी परिवारातील व्यक्ती किंवा प्रियंका गांधी-वाड्रा सुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदी असणार नाही, असे अनेकदा राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रियंका गांधी यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर केल्याचे दिसून आले.  

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीने असे ठरविले आहे की, संपूर्ण देशातील काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी पाच ग्रुप्स (नॉर्थइस्ट, इस्ट, नॉर्थ, वेस्ट आणि साऊथ) यामध्ये विभागणी करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणी या 5 ग्रुप्सच्या रिपोर्ट्सवर आज चर्चा करणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे.

आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सध्या सुरु आहे. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदी अनेक नेत्यांची नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, सुशिलकुमार शिंदे, ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्याही नावांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.  याशिवाय, आज सकाळी अकरा वाजता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, ए. के. एन्टोनी, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम आणि अहमद पटेल यांच्यासारख्या नेत्यांचीही काँग्रेसच्या मुख्यालयात बैठक पार पडली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी