शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

काेणी, काेणासाठी, किती राेखे खरेदी केले? गुरुवारपर्यंत सांगा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 05:32 IST

कोणतीही माहिती लपवली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करा, एसबीआय आणि निवडणूक आयोगाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क , नवी दिल्ली: निवडणूक रोख्यांवरील अल्फा न्यूमेरिकल क्रमांकांसह भारतीय स्टेट बँकेकडे (एसबीआय) असलेल्या प्रत्येक पैलूविषयी इत्थंभूत माहिती गुरुवार, २१ मार्चच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिले. हा तपशील सादर करताना निवडणूक रोख्यांविषयीची कुठलीही माहिती लपवून ठेवली नसल्याचे प्रतिज्ञापत्र एसबीआयने न्यायालयापुढे सादर करावे. बँकेकडून हा तपशील  मिळताच निवडणूक आयोगाने तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, असेही आदेश न्यायालयाने दिले.

निवडणूक रोख्यांची किती रकमेची, कोणी, कोणत्या तारखेला खरेदी केली, ते कोणत्या राजकीय पक्षांकडून कधी वठवण्यात आले, तसेच निवडणूक रोख्यांवरील अल्फा न्यूमेरिकल क्रमांकांसह संपूर्ण माहिती स्टेट बँकेला द्यायची आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेत न्या. संजीव खन्ना, न्या. भूषण गवई, न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज याप्रकरणी अतिशय तणावपूर्ण वातावरणात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान अनेकदा ज्येष्ठ वकिलांची घटनापीठातील न्यायमूर्तीसोबत बरीच शाब्दिक खडाजंगी उडाली.

कोणती माहिती उघड करावी, ते आम्ही सांगावे का? 

  1. निवडणूक रोख्यांविषयीची कोणती माहिती उघड करायची आहे ते न्यायालयाने एसबीआयला सांगावे का, रोख्यांशी संबंधित बारीकसारीक तपशील उघड करावा लागेल, असे आम्ही यापूर्वीच सांगितले आहे. 
  2. एसबीआयचे अध्यक्ष न्यायालयाला सर्व माहिती उपलब्ध करून देण्यास बाध्य आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायालयाला स्पष्टपणाने आणि प्रामाणिकपणाने सामोरे जावे. 
  3. बँकेकडे कायदेशीर सल्ला उपलब्ध असताना त्यांनी आमच्या आदेशाची वाट बघू नये व निवडक माहिती देऊ नये, अशा शब्दात घटनापीठाने स्टेट बँकेची कानउघाडणी केली. 

आणखी कटू शब्दांत बोलायला भाग पाडू नका; चंद्रचूड संतापले

  1. निवडणूक रोख्यांवरील अल्फा-न्यूमेरिकल क्रमांकांविषयीचा आदेश लांबणीवर टाकण्याची असोचॅम, फिक्की, सीआयआयच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची मौखिक विनंती फेटाळली. 
  2. तुम्ही निकाल दिल्यानंतर याचिका करत आहात, ती नियमानुसार करा. तुमच्यासारख्या ज्येष्ठ विधिज्ञाखातर मौखिक मागणी मान्य केल्यास कनिष्ठ वकिलांना मी कोणत्या तोंडाने सांगू. हे खपवून घेणार नाही, असे चंद्रचूड यांनी रोहतगी यांना सुनावले.
  3. मला आणखी कटू शब्दात बोलायला भाग पाडू नका, अशा शब्दात न्या. चंद्रचूड यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिश अगरवाला यांना सुनावले.

जनहित याचिकांना सामोरे जावे लागेल : साळवे

  • न्यायालयाचा आदेश समजून  घेण्यात गैरसमज झाल्याचा दावा करीत ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १५ फेब्रुवारीच्या आदेशात १२ एप्रिल २०१९ रोजीचा अंतरिम आदेशही सामावलेला असल्याची जाणीव न्यायालयाने करून दिली.
  • न्यायालयाचा आक्रमक पवित्रा बघून निवडणूक रोख्यांशी संबंधित सर्व तपशील सादर करण्याची ग्वाही साळवे यांनी दिली. या निकालामुळे पुढची दहा वर्षे जनहित याचिकांना सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSBIएसबीआय