शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

जाणून घ्या राष्ट्रपतीनियुक्त नव्या खासदारांचं कर्तृत्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 13:05 IST

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. त्याला ज्येष्ठांचं सभागृह असंही म्हणतात.

नवी दिल्ली- राष्ट्रपतींनी विविध क्षेत्रांमधील चार व्यक्तींना राज्यसभेचे सदस्य म्हणून आज नियुक्त केले आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. त्याला ज्येष्ठांचं सभागृह असंही म्हणतात. या सभागृहात विविध क्षेत्रांमधील लोकांचा अनुभव संसद व पर्यायाने देशाला व्हावा यासाठी राष्ट्रपती 12 सदस्यांची नियुक्ती करत असतात. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, कुस्तीपटू दारासिंह, कवी जावेद अख्तर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अशा विविध क्षेत्रांमधील दिग्गजांनी आजवर राज्यसभेचे सदस्यत्त्व स्विकारले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंह, रघुनाथ महापात्रा यांची नियुक्ती राज्यसभेत केली आहे.

1) राकेश सिन्हा- राकेश सिन्हा हे मूळचे बिहारचे बेगुसराईचे असून त्यांचे शिक्षण पाटणा व रांची येथे झाले. त्यांचे अनेक लेख जनसत्ता, हिंदुस्तान, दिनमान, रविवार, ऑर्गनायझर, पांचजन्य व अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ते दिल्ली विद्यापिठात प्राध्यापक असून इंडिया पॉलिसी फाऊंडेशनचे मानद संचालक आहेत. टीव्हीवरील अनेक चर्चांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बाजू मांडली आहे.

2)सोनल मानसिंह- सोनल मानसिंह या शास्त्रीय नृत्यअभ्यासक नृत्यांगना असून भरतनाट्यम व ओडिसी नृत्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आई गुजरातमधील एक ख्यातनाम समाजसेविका होत्या तर आजोबा स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यपाल होते. मानसिंह यांनी मणिपुरी नृत्यापासून आपल्या शिक्षणाची नागपूरयेथून सुरुवात केली. त्यांनी संस्कृत भाषेतील प्रवीण व कोविद या पदव्या संपादन केल्या आहेत. 1962 साली त्यांनी नृत्यातील करिअरला सुरुवात केली. त्यांना पद्मभूषण, संगीत-नाटक अकादमी, कालिदास सन्मान असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ नृत्यसेवेबद्दल दिग्दर्शक प्रकाश झा यांनी त्यांच्यावर सोनल नावाचा माहितीपटही प्रसिद्ध केला आहे.

3) रघुनाथ महापात्रा- रघुनाथ महापात्रा हे ओडिशातील एक सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि शिल्पविशारद आहेत. त्यांचा जन्म 23 मार्च 1943 साली झाला. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हस्तकला क्षेत्र तसेच कलाशिक्षणामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे.4) राम शकल- राम शकल हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते माजी खासदार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरुन उत्तर प्रदेशातील रॉबर्ट्सगंज मतदारसंघातून तीनवेळा लोकसभेत निवडून गेले होते.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाPresidentराष्ट्राध्यक्षMember of parliamentखासदारRamnath Kovindरामनाथ कोविंद