शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भारत पेट्रोलिअमची मालकी कोणाकडे? स्वदेशी की अमेरिकी कंपनी विकत घेणार, तीनच कंपन्यांना रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 08:56 IST

Bharat Petroleum : बीपीसीएलचा लिलाव होणार याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आल्याचे धर्मेंद प्रधान यांनी सांगितले. दीपमने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. मात्र, यावर अधिक माहिती देण्यास प्रधान यांनी नकार दिला.

केंद्र सरकार देशाची दुसरी सर्वात मोठी तेल कंपनी भारत पेट्रोलिअम (BPCL) मधील आपला पूर्ण 52.98 टक्के हिस्सा विकत आहे. यावरून देशभरातून जोरदार टीका होत असताना भारत पेट्रोलिअमच्या खरेदीसाठी तीन कंपन्यांनी बोली लावली आहे. 

पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी सांगितले की, भारत पेट्रोलिअमच्या खासगीकरणासाठी तीन कंपन्यांनी रस दाखविला आहे. यासाठी त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट पत्र जमा केले असून सुरुवातीच्या बोलीवरून या कंपन्यांची लिलावामध्ये निवड केली जाईल. पात्र कंपन्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये लिलावात भाग घेता येणार आहे. 

खाण क्षेत्र आणि तेल क्षेत्रात काम करणाऱ्या वेदांताने १८ नोव्हेंबरला याची कबुली दिली होती. यावेळी कंपनीने सांगितले होते की, केंद्र सरकारची बीपीसीएल खरेदी करण्यासाठी कंपनीने केंद्राला पत्र दिले आहे. महत्वाचे म्हणजे बीपीसीएलमध्ये अमेरिकेच्या दोन कंपन्या इच्छुक आहेत. यापैकी एक अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट आहे. यामुळे देशी कंपनीच्या ताब्यात बीपीसीएल जाणार की अमेरिकेच्या हे लिलावातील बोलीच ठरविणार आहेत. 

बीपीसीएलचा लिलाव होणार याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आल्याचे धर्मेंद प्रधान यांनी सांगितले. दीपमने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. मात्र, यावर अधिक माहिती देण्यास प्रधान यांनी नकार दिला. बीपीसीएलच्या विक्रीचे नियोजन करणाऱ्या दीपमचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी १६ नोव्हेंबरला ट्विट करत बोलीच्या अंतिम दिवशी काही कंपन्यांनी भारत पेट्रोलिअममध्ये रुची दाखविली आहे. 

आणखी कंपन्या विकणारधर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांचे खासगीकरण करण्याची योजना बनवत आहे. यामुळे या कंपन्यांची प्रतिस्पर्धा करण्याची क्षमता वाढणार आहे. या कंपन्या व्यावसायिक बनतील. बीएसईमध्ये रजिस्टर असलेली वेदांता लि. आणि त्यांची लंडन येथील मूळ कंपनी वेदांता रिसोर्सेसद्वारे गठीत केलेली विंगने १६ नोव्हेंबरला अर्ज सादर केला. रिलायन्सने हात आखडता घेतलाबीपीसीएलमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीला मुख्य दावेदार मानले जात होते. मात्र, रिलायन्सने त्याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर सऊदी अरामको, ब्रिटिश पेट्रोलिअम, टोटल सारख्या मोठ्या कंपन्यांनी देखील पाठ फिरविली आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलCentral Governmentकेंद्र सरकार