शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:43 IST

 कंठापुरम मुसलियार यांनी धार्मिक आधारावर संवाद सुरू केला. येमेनच्या परंपरेनुसार 'ब्लड मनी'च्या माध्यमाने माफीचा मार्ग सुचवला गेला. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने माफीसाठी ८.६ कोटी रुपये देऊ केले आहेत.

 

केरमधील नर्स निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशीची शिक्षा दिली जाणार होती. मात्र सध्या तिची शिक्षा टाळण्यात आली आहे. हे शक्य झाले आहे, भारतातील एका 94 वर्षीय वृद्ध धर्मगुरूंच्या पुढाकाराने. संपूर्ण जगात त्यांना 'ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाते.  कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार असे त्यांचे नाव आहे. ते भारतातील प्रमुख सुन्नी मुस्लीम नेते आहेत. त्यांनी येमेनचे प्रमुख सूफी धर्मगुरू शेख हबीब उमर बिन हाफिज यांच्या माध्यमाने मृत तालाल अब्दो महदीच्या कुटुंबीयांपर्यंत चर्चेचा मार्ग प्रशस्त केला.

'धार्मिक संवादा'ने मार्ग प्रशस्त - कंठापुरम मुसलियार यांनी धार्मिक आधारावर संवाद सुरू केला. येमेनच्या परंपरेनुसार 'ब्लड मनी'च्या माध्यमाने माफीचा मार्ग सुचवला गेला. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने माफीसाठी ८.६ कोटी रुपये देऊ केले आहेत.

कुठे आणि कशी झाली चर्चा? -ही महत्त्वाची बैठक येमेनमधील धमार शहरात झाली. येथे मृताच्या कुटुंबाने फाशीचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिले. यानंतर, येमेनच्या न्यायव्यवस्थेने निमिषाला १६ जुलै रोजी फाशी न देण्याचा निर्णय घेतला. तलाल अब्दो महदी यांचे कुटुंब हबीब उमर यांच्या सूफी पंथाशी देखील संबंधित आहे. यामुळे, कंठापुरम मुसलियार यांच्या विधानाला धार्मिक आदर मिळाला, यामुळे या संवादाला सकारात्मक दिशा मिळाली.

निमिषा प्रियावर नेमका काय आरोप? का सुनावण्यात आली फाशी? -केरळच्या पालक्कड जिल्ह्यातील कोल्लेंगोडे येथील रहिवासी असलेली निमिषा प्रिया २००८ मध्ये रोजगारासाठी यमनला गेली होती. २०२० मध्ये येमेनमधील एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं होतं. हा व्यक्ती निमिषाचा व्यावसायिक भागीदार होता. ही घटना जुलै २०१७ मध्ये घडली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने तिचं अपील फेटाळून लावलं होतं आणि देशाच्या सरकारी अभियोजकाने आता तिला मंगळवार, १६ जुलै रोजी फाशी देण्याचा आदेश दिला आहे. 

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालय