शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:48 IST

राहुल गांधी यांनी उदाहरण देत सांगितले की एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर हरियाणामध्ये तब्बल २२ वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या मॉडेलचे नाव मतदार याद्यांमध्ये आलेच कसे आणि तीच व्यक्ती विविध बूथांवर नोंदवली गेली कशी?

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हरियाणा विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर आणि मतदार याद्यांतील कथित गैरव्यवहारावरून गंभीर आरोप केले आहेत. राहुल यांनी बुधवारी (५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत, हरियाणाच्या मतदार यादीत सुमारे २५ लाखांहून अधिक बनावट मतदारांची नोंद असल्याचा दावा केला आहे.

राहुल गांधी यांनी उदाहरण देत सांगितले की एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर हरियाणामध्ये तब्बल २२ वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या मॉडेलचे नाव मतदार याद्यांमध्ये आलेच कसे आणि तीच व्यक्ती विविध बूथांवर नोंदवली गेली कशी? या प्रकरणाशी संबंधित फोटो सोशल मीडियावर मॅथ्यूज फेरारो या नावाने शेअर करण्यात आला होता, यामुळे या गडबडीचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले नाही.

राहुल गांधी यांनी उल्लेख केलेल्या त्या महिलेचे नाव, Matheus Ferroro नाही. तर Matheus Ferroro हे त्या फोटोग्राफरचे नाव आहे, ज्याने हा फोटो क्लिक केला होता. हा फोटो Unsplash आणि Pexels सारख्या वेबसाइट्सवर फोटोग्राफरच्या प्रोफाइलवर उपलब्ध.

काय म्हणाले होते राहुल गांधी? -"हरियाणात एका तरुणीने वेगवेगळ्या नावांनी २२ वेळा मतदान केले. तरुणीने कधी सीमा, कधी स्वीटी आणि कधी सरस्वती म्हणून मतदान केले आहे." यावेळी त्यांनी "बनावट मतदान" करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुलीचा फोटोही प्रसिद्ध केला. ते पुढे म्हणाले, हा फोटो देखील बनावट आहे कारण तो एका ब्राझिलियन मॉडेलचा आहे. हरियाणाच्या राय विधानसभा मतदारसंघात एका तरुणीने २२ वेळा मत दिलं. प्रत्येक मत वेगवेगळ्या नावाने होतं आणि १० मतदान केंद्रांवर नोंदणी केलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, ही महिला ब्राझिलियन मॉडेल मॅथ्यूस फेरेरो आहे.

राहुल गांधी म्हणाले की, हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव फक्त २२,७८९ मतांनी झाला, ज्यामुळे निवडणूक किती अटीतटीची होती हे दिसून येतं. हरियाणात पहिल्यांदाच पोस्टल बॅलेट प्रत्यक्ष निकालापेक्षा वेगळं होतं. यापूर्वी पाच प्रमुख एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's claims of Brazilian model voting in Haryana elections.

Web Summary : Rahul Gandhi alleged 2.5 million fake voters in Haryana, citing a Brazilian model voting multiple times. The model's name is not Matheus Ferroro; that's the photographer. Gandhi highlighted the close election result and questioned postal ballot discrepancies.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसHaryanaहरयाणाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग