शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
3
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
4
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
5
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
6
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
7
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
8
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
9
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
10
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
11
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!
12
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
13
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
14
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
15
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
16
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
17
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
18
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
19
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
20
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन

Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:23 IST

who is prashant kishor wife: राजकीय रणनीतीकार आणि जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या पत्नी जाह्नवी दास कोण आहेत आणि त्या काय करतात? 

Prashant Kishor Wife Jahnavi Das: जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. निवडणुकीच्या तयारीला लागलेले प्रशांत किशोर बैठका आणि कार्यक्रम घेताना दिसत आहे. अशातच त्यांच्या पत्नी जाह्नवी दास या चर्चेत आल्या. असे काय घडले की जाह्नवी दास यांच्याबद्दल बोलले जात आहे आणि त्या काय करतात, याबद्दल जाणून घ्या.

जन सुराजने महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी आपल्या पत्नीची म्हणजे जाह्नवी दास यांची ओळख करून दिली. 'हिच्यामुळेच (जाह्नवी दास) चिंतामुक्त होऊन बिहारमध्ये पदयात्रा करू शकत आहे', प्रशांत किशोर पत्नीचे कौतुक करताना म्हणाले. 

प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच आपल्या पत्नीचा सार्वजनिक कार्यक्रमात परिचय करून दिल्याने जाह्नवी दास चर्चेत आल्या आहेत. 

कोण आहेत जाह्नवी दास? 

जाह्नवी दास या मूळच्या आसामच्या रहिवासी आहेत. त्या पेशाने डॉक्टर आहेत. प्रशांत किशोर आणि जाह्नवी दास यांची पहिली भेट संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्यासंबंधीच्या अभियानादरम्यान झाली होती. सोबत काम करत असताना दोघे एकमेकांचे मित्र बनले. 

पुढे दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. नंतर दोघांनी लग्न करून संसार थाटला. दोघांना एक मुलगा आहे. सध्या जाह्नवी दास यांनी कामातून ब्रेक घेतला आहे. त्या प्रशांत किशोर आणि मुलासोबतच राहतात आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी सांभाळतात. 

पहिल्यांदाच समोर आल्या जाह्नवी दास

राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर हे देशभरात परिचित आहे. पण, राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने जाह्नवी दास यांचे नाव पहिल्यांदाच चर्चेत आले आहे. जाह्नवी दास यांचे कौतुक करताना प्रशांत किशोर कार्यक्रमात म्हणाले की, "एक महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असल्याने तुमचा भाऊ हे काम करू शकत आहे. तुमचे सहकार्य आहे म्हणून पुरूष काहीतरी चांगलं करू शकत आहेत."

टॅग्स :PoliticsराजकारणPrashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार