हरियाणातील सोनीपत येथील IPS पूजा यादव सध्या चर्चेत आहेत. सध्या त्या गुजरातमधील राजकोटमधील वाहतूक व्यवस्था सुधारण्यात व्यस्त आहेत. गरीब कुटुंबातून आलेल्या पूजा यादव यांची यशोगाथा खूपच प्रेरणादायी आहे. M.Tech शिकत असताना आणि नंतर रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केलं. यूपीएसपीमध्ये निवड झालेल्या पूजा यादव देशातील सर्वात सुंदर आयपीएस अधिकाऱ्यांमधील एक आहेत.
पूजा यादव या २०१८ च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्या हरियाणातील सोनीपतच्या आहेत. सध्या राजकोट, गुजरातमध्ये तैनात आहे. त्यांच्याकडे डीसीपी ट्रॅफिक राजकोट शहराची जबाबदारी आहे. हरियाणामध्ये आपलं सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक आणि नंतर फूड टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटमध्ये एम.टेक डिग्री मिळवली.
२० एप्रिल १९९१ रोजी जन्मलेल्या पूजा यादव यांचं २०१६ बॅचचे IAS अधिकारी विकास भारद्वाज यांच्याशी लग्न झालं आहे. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दोघांची भेट झाली. यानंतर दोघांनी २०२१ मध्ये लग्न केलं. यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्या होत्या, मात्र दुसऱ्या प्रयत्नात १७४ वा रँक मिळवला.
पूजा यादव जरी IPS असल्या तरी त्या एकेकाळी कॅनडाला करीअर करण्यासाठी गेल्या होत्या, तिथे नोकरी केली आणि नंतर जर्मनीला गेल्या. पण त्यानंतर त्या भारतात परतल्या. दोन वर्षांपूर्वी राजकोटच्या डीसीपी ट्रॅफिक झालेल्या पूजा यादव यांनी धडक कारवाई केली आहे. हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने डंपरच्या विरोधात कारवाई करण्यात आली.