शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्न कोण करतंय? राहुल गांधींच्या फोटोसह ४ पानी जाहिरात पाहून सगळे अवाक्, वाचा काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 18:09 IST

ही जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात ४ पानी छापण्यात आली आहे. ती पाहून तुम्हीही हैराण व्हाल

नवी दिल्ली - सध्या देशात राहुल गांधी यांचे नाव प्रचंड चर्चेत आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भूमिका घेत आहेत. याच राहुल गांधींच्या लग्नाबाबत अनेकांना प्रचंड उत्सुकता आहे. राहुल गांधी यांचे वय ५२ वर्ष झाले आहे. तरीही देशातील युवा नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. परंतु सध्या तामिळनाडूतील काँग्रेस नेत्याच्या जाहिरातीमुळे राहुल गांधी चांगलेच चर्चेत आले आहेत. 

तामिळनाडूच्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये राहुल गांधींचा हसता चेहरा आणि त्याचसोबत वेडिंग रिसेप्शन इन्विटेशन असं कॅप्शन पाहून सगळेच अवाक् झाले. ही जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात ४ पानी छापण्यात आली आहे. ती पाहून तुम्हीही हैराण व्हाल. वृत्तपत्राचे पान पलटले तर दुसऱ्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा चेहरा दिसतो. त्यानंतर तिसऱ्या पानावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी त्यानंतर पुढील पानांवर प्रियंका गांधी आणि शेवटी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज यांना स्थान देण्यात आले आहे. 

काँग्रेस नेत्याने दिली मेजवानी तामिळनाडू काँग्रेसचे नेते केएस अलागिरी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनची मेजवानी दिली आहे. यासाठी त्यांनी वर्तमानपत्रात चार पानी जाहिरात दिली आहे. मात्र, वृत्तपत्रात जाहिरात देऊन संपूर्ण राज्यातील जनतेला निमंत्रित करण्यात आले आहे की केवळ चार पानांमध्ये दाखवलेल्या नेत्यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे हे स्पष्ट नाही.  

मात्र वृत्तपत्राची जाहिरात पाहून सुरुवातीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच लग्न केले आहे आणि ते  रिसेप्शनसाठी आमंत्रित करत आहेत असं वाटतं. आता तुम्ही विचाराल की, स्वतः जाहिरातीत मुलगी कांचनच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी आमंत्रित केलेले केएस अलागिरी कुठे आहेत? त्यामुळे तुम्ही राहुल गांधींच्या फोटोखाली त्यांचा फोटो पाहू शकता. 

गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनाही संसदेतून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर त्यांना घर रिकामे करण्याची नोटीसही मिळाली. ते दोन दिवसांपूर्वी 'बेघर' झाले आहेत. वर्तमानपत्रातील जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होणार हे नक्की. सोशल मीडिया ट्रोलिंग करण्यात माहीर असलेल्यांनी राहुल गांधी बेघर होऊन सेटल व्हायला गेले आहेत का? असा सवालही केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस