शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 11:23 IST

या हीरा व्यापाऱ्याने देणगी देणण्याच्या बाबतीत मोठ-मोठ्या  उद्योगपतिंनाही मागे टाकले आहे.

आज भारताच्या इतिहासाला आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला जाणार आहे. आज अयोध्येत रामलला विराजमान होणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर पूर्णपणे सजले असून प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज झाले आहे. आज दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणर आहे.

महत्वाचे म्हणजे, या भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्णपणे रामभक्तांकडून देण्यात आलेल्या देणगीतून सुरू आहे. राम मंदिरासाठी देश आणि परदेशातील कोट्यवधी भक्तानी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी कुठल्याही सरकारने एक पैसाही दिलेला नाही. हे मंदिरी पूर्ण पणे भक्त मंडळींनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांतून उभे रात आहे. या मंदिरासाठी सर्वा मोठी देणगी सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने दिले आहे. या हीरा व्यापाऱ्याने देणगी देणण्याच्या बाबतीत मोठ-मोठ्या  उद्योगपतिंनाही मागे टाकले आहे. सुरतमधील दिग्गज हीरे व्यापारी दिलीप कुमार व्ही. लाखी यांच्या कुटुंबाने अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं देणगी स्वरुपात दिले आहे. याचा वापर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दरवाजांना सोन्याने मढवण्यासाठी केला जाणार आहे.

दिलिप कुमार व्ही. लाखी हे सूरत मधील सर्वात मोठ्या हीरे फॅक्ट्रिंपैकी एक असलेल्या फॅक्ट्रीचे मालक आहेत. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरासाठी लाखी कुटुंबाने ट्रस्टला आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी दिल्याचे सांगितले जात आहे. लाखी कुटुंबाने राम मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू आणि खांब तसेच मंदिराच्या तळमजल्यावरील 14 सुवर्ण दरवाजांसाठी 101 किलो सोने पाठविले आहे. 

भेट केलं 68 कोटी रुपयांचं सोनं -सध्या सोन्याचा दर 68 हजार रुपए प्रति 10 ग्रॅम एढा आहे. यानुसार एक किलो सोन्या दर जवळपास 68 लाख रुपए एवढा होतो. यानुसार एकूण 101 किलो सोन्याची किंमत जवळपास 68 कोटी रुपये एवढी होते. अशा प्रकारे लाकी कुटूंबाने राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी दुसऱ्या स्वरुपाची देणगी दिली आहे, ते कथावाचक आणि आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांनी. त्यांनी राम मंदिरासाठी 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याशिवाय अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये बसलेल्या त्यांच्या रामभक्त अनुयायांनीही वेगवेगळ्या स्वरुपात तब्बल 8 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तसेच, राम मंदिर उभारणीसाठी गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गोविंदभाई ढोलकिया हे डायमंड कंपनी श्रीरामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याGujaratगुजरात