शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

हत्येचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला? : उमर अब्दुल्ला; जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 05:58 IST

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी इराणचे नेते अयातुल्ला खमेनेई यांच्या हत्येचा निषेध केला आहे. सुरक्षा दलांनी बळाचा वापर करू नये आणि नागरिकांनी संयम पाळावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. वाचा सविस्तर.

जम्मू : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्युबद्दल जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर  अब्दुल्ला यांनी मंगळवारी निषेध व्यक्त केला. तसेच काश्मिरी नागरिकांनी संयम दाखवून कायदेशीर मार्गांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. कोणत्या कायद्याने अमेरिका आणि इस्रायलला खामेनेई यांची हत्या करण्याचा अधिकार दिला, असा प्रश्नही त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

“खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबाच्या हत्येचा मी तीव निषेध व्यक्त करतो. आता इराणने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय आपल्या नव्या नेत्याची निवड करावी”, असे मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले. जम्मू - काश्मीरच्या नागरिकांनी परिस्थिती चिघळेल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. “पोलिस किंवा केंद्रीय निमलष्करी दलांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला किंवा अतिरेक केला आणि त्याची निष्पत्ती कुणाच्या दुखापतीत झाली, तर तो लोकांच्या तीव्र भावनांशी खेळ ठरेल”, असा इशाराही त्यांनी खामेनेई यांच्या मृत्युनंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिला.

काही लोक राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही ठिकाणांहून अप्रिय घटना घडल्याची वृत्त येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निमलष्करी दलांनी आणि पोलिसांनी बळाचा वापर करू नये, असे अब्दुल्ला म्हणाले. (वृत्तसंस्था)

English
हिंदी सारांश
Web Title : Who Gave America the Right to Kill?: Omar Abdullah Protests

Web Summary : Omar Abdullah condemned Khamenei's killing, questioning America's authority. He urged Kashmiris to express grief lawfully, warning against escalating violence. Abdullah cautioned security forces against excessive force amid unrest.
टॅग्स :IranइराणOmar Abdullahउमर अब्दुल्ला