शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 06:14 IST

हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक रिंगणात १०३१ उमेदवार असून, त्यामध्ये १०१ महिला व ४६४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

चंडीगड : हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांत शनिवारी (दि. ५) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६१   टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. हिंसाचाराच्या काही तुरळक घटना वगळता बहुतांश राज्यात मतदान शांततेत पार पडले. त्या राज्यात भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर येणार की काँग्रेस भाजपचा पराभव करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हरयाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहेत. 

हरयाणामध्ये मागील दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. तिथे आमचाच पक्ष पुन्हा विजयी होणार असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अन्य दिग्गज नेत्यांना निवडणूक प्रचारात केला होता, तर यावेळी भाजपचा दणदणीत पराभव करून आम्ही सत्तेवर येऊ असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. हरयाणातील विधानसभा निवडणुकांत शनिवारी शांततेेने मतदान पार पडले. 

निवडणूक रिंगणात १०३१ उमेदवार

- हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक रिंगणात १०३१ उमेदवार असून, त्यामध्ये १०१ महिला व ४६४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

- हरयाणात शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला व ही प्रक्रिया संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. मुख्यमंत्री सैनी यांची काँग्रेसवर टीका

- भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे कुरुक्षेत्र विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, त्यांनी अंबाला जिल्ह्यातील मिर्झा येथे मतदान केले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, काँग्रेसने मागासवर्गाचा कायम अपमान केला आहे. त्यांच्या कल्याणासाठी एकही योजना अमलात आणली नाही. 

 

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण