शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जी-२०च्या यशामागील पडद्यामागचे चेहरे कोण? अनेक महिने सुरू होती जोरदार तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 06:35 IST

G20 Summit: जी-२० बैठकीच्या यशामागे अनेक महिन्यांची भारताची जोरदार तयारी आणि योजनाबद्ध पद्धतीने कुटनीतीक, आर्थिक, डिजिटल व सांस्कृतिक आघाडीवरील रणनीतीची अंमलबजावणी आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली - जी-२० बैठकीच्या यशामागे अनेक महिन्यांची भारताची जोरदार तयारी आणि योजनाबद्ध पद्धतीने कुटनीतीक, आर्थिक, डिजिटल व सांस्कृतिक आघाडीवरील रणनीतीची अंमलबजावणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने काम केलेले आहे. 

जी-२० शिखर परिषदेच्या ऐतिहासिक आयोजनात जागतिकस्तरावर भारताच्या मोठ्या मानसन्मानामागे काही अशा गोष्टी आहेत, ज्यांचा उल्लेख करावाच लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश दिले होते की, देशातील ५०पेक्षा जास्त शहरांत जी-२० देशांच्या विविध विषयांवर आयोजन झाले पाहिजे. हे लक्षात घेऊन जी-२० देशांच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, वित्तमंत्री, पर्यटन, संस्कृती, कम्युनिकेशन, गृह, विदेश, संरक्षण, शहरी विकास, रेल्वे, कृषी, आरोग्यमंत्र्यांचे संमेलन देशाच्या विविध शहरांत अनेक महिन्यांपासून आयोजित करण्यात आले होते. या आयोजनाने संपूर्ण देशात जी-२०बाबत जागरूकता वाढविण्याचे काम केले.

जी-२० बैठकीच्या यशस्वी आयोजनात पडद्यामागे ज्यांची सर्वांत महत्त्वाची भूमिका मानली जात आहे, त्यात सर्वांत प्रमुख नाव केंद्रीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांचे आहे. त्यांच्याबरोबर आयोजनाचे शेरपा अमिताभ कांत, आयोजनाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रंगला, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भूमिका महत्त्वाची आहे.

रशियावरून पेच     नवी दिल्ली घोषणापत्रात रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियाचे नाव समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावरून पेच निर्माण झाला होता. रशियाचे नाव समाविष्ट केल्यास चीनसह अनेक देश भडकले असते व जी-२० बैठकीची कोणत्याही घोषणापत्राशिवाय समाप्ती झाली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व चान्सलर यांच्याशी चर्चा केली होती. जी-२० हा कोणतेही राजनीतीक व्यासपीठ नाही. हे आर्थिक व्यासपीठ आहे. रशियाचे नाव घेतल्याशिवायही पुढे जाऊ शकतो.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकरNarendra Modiनरेंद्र मोदी