शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वादंग सुरू असतानाच राफेल स्वागताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 04:26 IST

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत केलेल्या करारावरून राजकीय वादंग सुरू असतानाच या विमानांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणे व वैमानिकांना प्रशिक्षण देणे

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत केलेल्या करारावरून राजकीय वादंग सुरू असतानाच या विमानांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणे व वैमानिकांना प्रशिक्षण देणे यासह इतर पावले उचलत भारतीय हवाई दलाने या नव्या विमानांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.दसॉल्ट अ‍ॅव्हिएशन या कंपनीकडून ३६ राफेल विमाने घेण्याचा ५८ हजार कोटी रुपयांचा करार भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्स सरकारशी केला. आधीचा करार बदलून मोदी सरकारने विमानांची अव्वाच्या सव्वा वाढीव किंमत मान्य केली व हे करत असताना प्रस्थापित प्रक्रियांना बगल दिली गेली, असा काँग्रेसचा आरोप आहे.सरकारी सूत्रांनुसार अनेक प्रकारची अत्याधुनिक शस्त्रे व क्षेपणास्त्रे घेऊन उड्डाण करण्याची आणि ती अचूकपणे डागण्याची क्षमता असलेल्या राफेल विमाने पुढील वर्षी सप्टेंबरपासून भारताच टप्प्याटप्प्याने पुरविली जायची आहेत. करार झाल्यापासून ६७ महिन्यांत सर्व ३६ विमाने पुरविली जाणार आहेत. दसॉल्ट कंपनी भारताला हव्या तशा शस्त्रांसाठी विमानांमध्ये फेरबदल करून देणार आहे. त्यासाठी हवाई दलाच्या अधिकाºयांनी या आधीच फ्रान्सला जाऊन आपल्याला नेमके काय हवे ते दसॉल्ट कंपनीला कळविले आहे.सूत्रांनुसार पहिली राफेल विमाने मिळायला अजून एक वर्ष असले, तरी ही विमाने हाती येताच लगेच ती सक्रिय सेवेत रुजू करता यावीत, यासाठी हवाई दलाने जय्यत तयारी सुरू केली आहे. यात या विमानांच्या स्थायी तळासाठी पायाभूत सुविधा उभारणे व वैमानिकांना ही विमाने चालविण्याचे प्रशिक्षण देणे या गोष्टींचा समावेश आहे. पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने याआधीच ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.>सीमेवर दोन स्वॉड्रनराफेल विमाने हवाईदलात दाखल झाल्यावर त्यांच्या दोन स्वॉड्रन पश्चिम आणि पूर्व सीमेवर मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्याची तयारीही सुरू झाली आहे. पहिली स्वॉड्रन भारत-पाक सीमेपासून अवघ्या २२० किमी अंतरावर असलेल्या अंबाला येथे असेल. दुसरी स्वॉड्रन प. बंगालमधील हासिमारा हवाईतळावर तैनात करण्यात येईल. या दोन्ही ठिकाणी राफेल विमानांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्याचे व दुरुस्ती आणि देखभालीची व्यवस्था करण्याचे कामही सुरू झाले आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील