शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 17:01 IST

Uttarakhand News: पॅराग्लायडिंग (Paragliding) करत असताना तोल जावून खाली तलावात कोसळलेल्या एका तरुणाचे प्राण सुदैवाने वाचल्याची थरारक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे.

पॅराग्लायडिंग करत असताना तोल जावून खाली तलावात कोसळलेल्या एका तरुणाचे प्राण सुदैवाने वाचल्याची थरारक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. उत्तराखंडमधील प्रसिद्ध टिहरी तलावाच्या परिसरामध्ये एक तरुण पॅराग्लायडिंगचा आनंद घेत होता. त्याचवेळी त्याच्या पॅराशूटचा तोल गेला आणि तो तरुण पॅराग्लायडरसह थेट तलावात पडला. मात्र या घटनेबाबत माहिती मिळताच एसडीआरएफच्या पथकाने प्रसंगावधान दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि या तरुणाचे प्राण वाचवले. दरम्यान, या बचाव मोहिमेचे व्हिडीओ स्थानिक लोकांनी चित्रित केले असून, ते आता सोशल मीडियावर  व्हायरल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार येथे पॅराग्लायडिंगचं प्रशिक्षण सुरू होतं. त्याचदरम्यान टिहरी गढवाल येथे असलेल्या प्रसिद्ध टिहरी तलावाजवळ ही दुर्गटना घडली. पॅराग्लायडिंग करत असताना एका तरुणाच्या पॅराशूटचा तोल गेला आणि तो थेट तलावात कोसळला.  त्यानंतर एसडीआरएफच्या पथकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सदर तरुणाला तलावातून बाहेर काढले.

या दुर्घटनेत बचावलेला ऋषी हा तरुण नैनीताल येथील रहिवासी आहे. तलावात पॅराशूट कोसळल्याची माहिती मिळताच एसडीआरएफच्या बचाव पथकाने तातडीने बोटच्या मदतीने सदर तरुणाला तलावातून बाहेर काढले.   

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडParaglidingपॅराग्लाइडिंगAccidentअपघात