शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

...तर काश्मीरमध्ये चिनी सैन्य घुसवू

By admin | Updated: July 11, 2017 06:24 IST

पाकिस्तानने हस्तक्षेपाची विनंती केल्यास पाकिस्तानच्या दिशेने तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मिरात घुसखोरी करू शकते

बीजिंग : पाकिस्तानने हस्तक्षेपाची विनंती केल्यास पाकिस्तानच्या दिशेने तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मिरात घुसखोरी करू शकते, असा इशारा देत आम्हीच तेथून काश्मीरमध्ये घुसू, असे चीनच्या सरकारी माध्यमांनी सूचित केले आहे. सिक्किमजवळील डोकलामच्या मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच चीनने प्रथमच या वादात काश्मीरमध्ये घुसण्याची अप्रत्यक्ष भाषा सुरू केली आहे. चीनने तिसऱ्या देशाचे सैन्य असा उल्लेख केला असला तरी त्या देशाची स्वत:च तिथून काश्मिरात घुसण्याची तयारी असल्याचे मानले जाते. एकीकडे भारत व पाकिस्तान संबंध तणावाचे आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी लष्कर भारताच्या दिशेने गोळीबार व तोफांचे मारे करीत आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसण्यास मदत करणे आणि काश्मीरमधील अतिरेक्यांना सततची मदत हाही पाकिस्तानच्या कारवायांचा भाग आहे. त्यातच भारत व अमेरिका संबंध वृद्धिंगत होत असल्याने पाकिस्तान व चीन दोघेही अस्वस्थ आहेत. पाकमधील अनेक प्रकल्पांमध्ये सध्या चीनची गुंतवणूक असून, हे दोन्ही देश आता मित्रच बनले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने विनंती केल्यास काश्मीरमध्ये घुसण्याची धमकी देणे, याला बराच अर्थ आहे. सरकारी मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे की, ज्या प्रकारे डोकलाममध्ये चीनचे रस्त्याचे काम भारतीय सैन्याने रोखले आहे, ते पाहता पाकिस्तानच्या विनंतीवरून काश्मीरमध्ये तिसऱ्या देशाचे (पान ९ वर)(पान १ वरून) सैन्य घुसू शकते. भारताकडून भूतानचे क्षेत्र वाचविण्याचा प्रयत्न होत असेल तर, तो त्यांच्या क्षेत्रापर्यंतच मर्यादित असायला हवा. वादग्रस्त क्षेत्रासाठी नकोय. अन्यथा, भारताच्याच तर्काने कृती करायची झाल्यास तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मीरसह वादग्रस्त क्षेत्रात घुसू शकते. या लेखात म्हटले आहे की, भारतीय सैनिकांनी भूतानला मदत करण्याच्या नावाखाली चीनच्या डोकलाम भागात प्रवेश केला आहे. भारताकडून दुसऱ्या देशाच्या अंतर्गत प्रश्नात दखल न देण्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्याकडून संयुक्त राष्ट्राच्या घोषणापत्राचे उल्लंघन होत आहे. भारताने सिक्किमवरही असाच ताबा मिळविला आहे. भारताला अशी भीती आहे की, चीन सैन्याच्या बळावर पूर्वोत्तर भारताला मुख्य भारतापासून वेगळे करेल. (वृत्तसंस्था)>चीनच्या राजदूतांना राहुल गांधी भेटल्याने वादळनवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या भारतातील राजदूतांच्या घेतलेल्या भेटीवरून काँग्रेसवर भाजपाने हल्ला चढविला असून, काँग्रेसनेही तशाच कडक भाषेत भाजपा व मोदी सरकारवर प्रतिहल्ला केला आहे. शनिवारी गांधी आणि चीनचे भारतातील राजदूत लुओ ज्हाओहुई यांची भेट झाली. त्यावरून भाजपाने राहुल यांच्यावर हल्ले सुरू केले. काँगे्रसनेही त्याला तसेच उत्तर देताना चीनने द्विपक्षीय चर्चेला नकार दिल्यानंतरही जर्मनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी का गेले, असा प्रश्न विचारला आहे. >भारताने भूतानचा मान ठेवावा!लेखात असेही म्हटले आहे की, चीनचे रस्त्याचे काम म्हणजे भारताविरुद्धचा भूराजकीय उद्देश असल्याचे भारताचे म्हणणे आहे. मात्र, भारत स्वत: असे करण्यास अक्षम असल्यामुळेच चीनचे काम त्यांनी रोखले आहे. भारताची कृती ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. चीन आणि भुतान यांच्यातील वाद दोन्ही पक्षांनी सोडवायला हवा आणि भारताने भुतानच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करायला हवा.