शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

यावेळी राहुल गांधी कुठून लढणार निवडणूक? उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:52 IST

अजय राय म्हणाले, राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जो प्रेमाचा संदेश दिला आहे, खर्गे आणि आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा जो संदेश आहे, तो काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्ये घरो घऱी पोहोचवतील.

उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अजय राय पहिल्यांदाच वाराणसीत लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. येथे पोहोचताच हजारो कार्यकर्त्यांनी अजय राय यांचे ढोल, ताशा आणि हारासह स्वागत केले. यावेळी, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

अमेठीतून निवडणूक लढणार राहुल गांधीयावेळी, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारला असता अजय राय म्हणाले, बिल्कुल लढतील. अमेठीचे लोकही येथे आले आहेत. प्रियंका गांधी जेथून म्हणतील, आम्ही त्यांचे पूर्ण समर्थन करू. यावेळी स्मृती ईरानी यांच्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, त्या म्हणाल्या होत्य की, कमळाचे बटन दाबा, 13 रुपये किलो साखर मिळेल. त्या देऊ शकल्या? 

अजय राय म्हणाले, या राज्यातील सर्वात मोठा मुद्दा आहे बेरोजगारीचा, महागाईचा आणि लोकांना घाबरवून आपल्या सोबत घेण्याचा. ते लोकांना ED, CBI चा धाक दाखवून वातावरण तयार करत आहेत. अजय राय म्हणाले, राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जो प्रेमाचा संदेश दिला आहे, खर्गे आणि आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा जो संदेश आहे, तो काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्ये घरो घऱी पोहोचवतील. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSmriti Iraniस्मृती इराणीlok sabhaलोकसभा