शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखिलेश यादव यांची सायकल रुतली कोठे? जिथे मोठमोठे गुन्हे झाले तिथेही भाजप खुलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:49 IST

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत होती, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मायावती. यावेळी राष्ट्रीय लोक दल, सुहेलदेव भारतीय समाज पक्षासारखे छोटे पक्ष त्यांच्यासोबत होते तर बसपा व काँग्रेस विरोधात.

सुधीर लंकेलोकमत न्यूज नेटवर्कलखनऊ :  उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची ‘सायकल’ पुन्हा एकदा रुतली. ती अधिक जोमाने धावू शकली नाही. अखिलेश यादव या निवडणुकीत एकाकी झुंजताना दिसले. त्यांची प्रचारनीती ‘मोदी’ व ‘योगी’ यांचा करिष्मा पुसू शकली नाही. 

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत होती, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मायावती. यावेळी राष्ट्रीय लोक दल, सुहेलदेव भारतीय समाज पक्षासारखे छोटे पक्ष त्यांच्यासोबत होते तर बसपा व काँग्रेस विरोधात. त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून सर्व भार अखिलेश यांच्यावर आला. स्वामीप्रसाद मौर्य यांसारख्या ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी बिगर यादव ओबीसी मते जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मौर्यांसारखे नेतेच परभूत झाल्याने ही मते त्यांच्यासोबत पुरेशा प्रमाणात आलेली दिसत नाहीत. अनेक ठिकाणी बसपा व समाजवादी पक्ष यांच्यात मतविभागणी झाली. काही ठिकाणी मुस्लीम उमेदवारच आमनेसामने आले. त्याचा फटका बसला.

बाहुबली’ व ‘परिवारवादी’ पार्टी म्हणून मोदी-योगी यांनी समाजवादी पक्षावर टीका केली. यादव सत्तेत आले तर पुन्हा दादागिरी वाढेल, असा आक्रमक प्रचारही भाजपने केला. मतदारांच्या मनातील ही भीती अखिलेश दूर करू शकले नाहीत. ‘नयी हवा है, नयी सपा है,’ असा त्यांचा यावेळचा नारा होता. मात्र, नवीन समाजवादी पक्ष कसा असेल, हा अजेंडा मतदारांवर बिंबविण्यात ते कमी पडले. ‘गुंडगिरी’ व ‘माफियाराज’ या प्रचाराला उत्तरे देण्यातच ते अडकून पडले.  

‘या’ जागांवरही भाजप विजयीहाथरस : दलित मुलीवर सामूहिक अत्याचार१४ सप्टेंबर २०२० राेजी एका १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक अत्याचार झाला हाेता. सुरुवातीला याप्रकरणी काेणतीही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्याने देशभर संताप व्यक्त झाला. मात्र, येथे भाजपचे अंजुला सिंह महाैर यांनी १ लाख ५४ हजार मते मिळवून दणदणीत विजय प्राप्त केला. 

उन्नाव : महिलेवर बलात्कार, आमदारावर गुन्हाभाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर एका महिलेचे अपहरण करून अत्याचार करण्याचा तसेच महिलेच्या वडिलांसह तीन नातेवाइकांची हत्या केल्याचाही गुन्हा नोंदविण्यात आला होता. सेंगर यांना पोक्सोसह अन्य गुन्ह्यांप्रकरणी अटकही झाली होती. मात्र, येथे भाजपचे उमेदवार पंकज गुप्ता विजयी झाले आहे. उन्नावमध्ये अत्याचार पीडितेच्या आईला काँग्रेसने उमेदवारी दिली होती.  

लखीमपूर : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलेजिल्ह्यातील सर्व ८ जागांवर भाजपने पुन्हा बाजी मारली. लखीमपूरमधील टिकुनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याने ८ शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा जीव घेतल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र,घटना घडली त्या निघोसन मतदारसंघात भाजपचे विद्यमानआमदार शशांक वर्मा पुन्हा निवडून आले आहेत.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२