शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

एक लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम नेमकी गेली कोठे?; विरोधकांचा केंद्राला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 06:36 IST

बँक फसवणुकीवर आरबीआयचा अहवाल

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वर्ष २०२०-२१ च्या वार्षिक अहवालाने बँकांच्या फसवणुकीवर झालेल्या खुलाशाने राजकीय खळबळ निर्माण केली आहे. विरोधी पक्ष सरकारला विचारत आहेत की, एक लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम रिझर्व्ह बँकेची ज्या रीतीने लुटली गेली, ती आहे कोठे? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी हा प्रश्न विचारून सरकारवर हल्ला केला. त्यांनी विचारले की, पेट्रोल, डिझेलवर कर लावून १.८ लाख कोटी रुपये सरकारने ज्या प्रकारे अतिरिक्त महसूल गोळा केला त्याचा हिशोब काय? काँग्रेसनेही मोदी सरकारवर टीका करताना आकडेवारी सादर केली. बँकांच्या फसवणुकीचे प्रकार २०१४-२०१५ च्या तुलनेत वाढले आहेत. २०२०-२१ मध्ये बँकांची १.३८ लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आणि मोदी सरकार बघत राहिले. २०१४-२०१५ आणि २०२०-२०२१ दरम्यान झालेल्या फसवणुकीतील अंतर एकूण रकमेच्या ५७ टक्के सीएजीआरच्या दराने वाढले आहे. जेव्हा लोन मोरोटोरियम लागू केले गेले तेव्हा फसवणुकीची रक्कम १,३८,४२२ कोटी रुपये होती. सरासरी वर्ष २०१८-२०१९ मध्ये १०.५ कोटी रुपयांनी वाढून ही रक्कम २१.३ कोटी रुपयांपर्यंत गेली. एफएमसीजी क्षेत्रात १६ टक्के घट दिसली आहे. त्यामुळे जीडीपीत २.४ ते तीन टक्के घट नोंद झाली. मूडीजनुसार जीडीपीचे सरासरी अनुमान ९.३ टक्के, क्रिसिलनुसार ८.२ टक्के आणि नोमुरानुसार १०.८ टक्के आहे. दैनंदिन गरजेच्या सामानाची विक्री घटली आहे. वर्ष २०२०-२०२१ मध्ये बांधकाम क्षेत्रात ३२ टक्के रोजगार कमी झाला आहे. काँग्रेसने विचारले तीन प्रश्न.... काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी सरकारला तीन प्रश्न विचारले. गेल्या सात वर्षांत सतत बँकांची फसवणूक होत आहे, तरी मोदी सरकार काय करीत आहे? ही रक्कम परत मिळविण्यासाठी सरकारने काय उपाय योजले आणि अशा फसवणूक करणाऱ्यांकडून सरकारने किती पैसे वसूल केले?स्टेट बँक ऑफ इंडियाकडील आकडेवारी विचारात घेतली तर कोरोना महामारीमुळे मे महिन्यात दर आठवड्याला ८ अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागत आहे. ५.४ लाख कोटींचे नुकसान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एका ढोबळ अंदाजानुसार होईल.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकcongressकाँग्रेस