शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचा स्वीस बँकेतील पैसा नेमका गेला तरी कुठे?; प्राप्तिकर खात्याकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:27 IST

स्वीस बँकांमध्ये लाखाे काेटी रुपयांचा काळा पैसा लपवणाऱ्यांची यादी काही वर्षांपूर्वी लीक झाली हाेती. मात्र, या बँकांमध्ये हा पैसा राहिलेला नाही.

नवी दिल्ली : प्राप्तिकर खात्याला सध्या एका प्रश्नाने भंडावून साेडले आहे. ताे म्हणजे, भारतीयांनी स्वीस बँकेमध्ये लपवलेला काळा पैसा गेला कुठे? हाेय. हे खरे आहे. स्वीस बँकांमध्ये लाखाे काेटी रुपयांचा काळा पैसा लपवणाऱ्यांची यादी काही वर्षांपूर्वी लीक झाली हाेती. मात्र, या बँकांमध्ये हा पैसा राहिलेला नाही. त्याचाच शाेध घेण्याचे काम प्राप्तिकर खात्यातर्फे सुरू आहे.एचएसबीसी बँकेच्या जिनेव्हा येथील मुख्यालयातील खात्यांमध्ये काही भारतीयांनी प्रचंड पैसा साठवून ठेवला हाेता. अशा खातेदारांची यादी २०१०मध्ये बँकेच्या एका कर्मचाऱ्याने लीक केली हाेती. त्यानंतर फ्रान्स सरकारनेही २०११ - १२मध्ये एक यादी भारताला दिली हाेती. अशा सुमारे २४ हजार खातेधारकांची नावे त्यात हाेती. प्राप्तिकर खात्याने त्यांना नाेटीस पाठविल्या हाेत्या. परदेशातील संपत्ती, निधी, मालकी इत्यादींबाबत ७ ते ९ वर्षांची माहिती प्राप्तिकर खात्यातर्फे मागविण्यात आली हाेती. मात्र, या खात्यांमधील पैसा इतरत्र वळविण्यात आला आहे. काही जणांनी खाते असल्याचे नाकारले आहे. तसेच काहींनी त्या कालावधीत अनिवासी भारतीय असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्राप्तिकर खात्याने त्यांचा भारतातील वास्तव्याचा कालावधी, पासपाेर्ट इत्यादी माहितीही मागविली आहे. (वृत्तसंस्था)पैसा वळविला कुठे?नाेटीस मिळाल्यानंतर हे नागरिक अनिवासी भारतीय तर झाले नाहीत ना? याचा शाेध घेण्यात येत आहे. तसेच परदेशातील मालमत्तेची माहिती मागविल्यामुळे नाेटीस मिळाल्यानंतर पैसा इतरत्र वळविण्यात आला की नाही, याचीही माहिती मिळेल. 

टॅग्स :Swiss Bankस्विस बँक