शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 14:07 IST

Pawan Kalyan News: ईशनिंदेवर  नक्कीच टीका केली पाहिजे. मात्र धर्मनिरपेक्षतेचा ढालीसारखा वापर केला जाता कामा नये, असेही पवन कल्याण यांनी सांगितले.

प्रक्षोभक विधान केल्याने पुण्यातील विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोली हिला झालेल्या अटकेवरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शर्मिष्ठा पनोली हिला पाठिंबा दिला आहे. तसेच ईशनिंदेवर  नक्कीच टीका केली पाहिजे. मात्र धर्मनिरपेक्षतेचा ढालीसारखा वापर केला जाता कामा नये, असेही पवन कल्याण यांनी सांगितले. धर्मनिरपेक्षता ही काही लोकांसाठी ढाल आणि इतरांसाठी तलवार नाही आहे. ती दुधारी असली पाहिजे. पश्चिम बंगाल पोलिसांकडे राष्ट्राची नजर लागलेली आहे. त्यांनी सर्वांसाठी न्यायपूर्ण पद्धतीने काम करावं.

पवन कल्याण म्हणाले की, जेव्हा राजकीय नेते, तृणमूल काँग्रेसचे खासदार हे सनातन धर्माची खिल्ली उडवतात, तेव्हा काय होतं? जेव्हा आमच्या धर्माला घाणेरडा धर्म म्हटलं जातं, तेव्हा हा आक्रोश कुठे जातो. त्यांची माफी कुठे जाते. त्यांची त्वरित अटकेची कारवाई कुठे होते? असा सवाल पवन कल्याण यांनी विचारला.

भाजपाच्या बंगालमधील कार्यकारिणीनेही कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या शर्मिष्ठा पानोली हिच्याविरोधात कोलकाता पोलिसांनी रातोरात केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शर्मिष्ठा हिच्यावर एका विशिष्ट्य समूदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे व्होटबँकेचं राजकारण असल्याची टीका भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार म्हणाले की, शर्मिष्ठा हिला हटवण्यात आलेल्या एका व्हिडीओवरून का अटक करण्यात आली आहे? शर्मिष्ठा हिने सार्वजनिकरीत्या माफी मागितली होती, तसेच तिच्या व्हिडीओमध्येही फारसं आक्षेपार्ह असं काही नव्हतं, असा दावाही त्यांनी केला आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसJansena Partyजनसेना पार्टीpawan kalyanपवन कल्याण