नवी दिल्ली : लाेकशाहीचा सर्वात माेठा उत्सव म्हणजे लाेकसभेची निवडणूक. यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी निवडणूक आयाेग सतत प्रयत्नशील असतो. मात्र, काही मतदारसंघांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी असते. त्यात सुशिक्षित आणि प्रगत म्हणवणाऱ्या महानगरांमध्ये तर मतदार फार उदासिन असल्याचे आकडेवारी सांगते. २०१९मध्ये झालेल्या लाेकसभा निवडणुकीत देशाचे सरासरी मतदान ६७.४ टक्के हाेते. त्यापेक्षा कमी मतदान झालेल्या २६६ मतदारसंघांची यावेळी निवडणूक आयाेगाने ओळख पटविली असून त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
२९.७ काेटी मतदारांनी २०१९च्या लाेकसभा निवडणुकीत मतदान केले नाही.११ माेठ्या राज्यांमध्ये मतदानाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी.२९ मतदारसंघ महानगरांमधील आहेत, जिथे ५८ टक्क्यांच्या आसापास मतदान झाले.११ मतदारसंघ हे महत्त्वाच्या शहरांमधील आहेत.८ मतदारसंघ महाराष्ट्रातील असून ते सर्व माेठ्या शहरांमधील आहेत.१४ महानगरातील मतदारसंघांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले.५० सर्वात कमी मतदान झालेल्या मतदारसंघातील १७ जागा या महानगर किंवा माेठ्या शहरांतील आहेत.७० टक्के मतदारसंघ हे युपी, महाराष्ट्र आणि बिहारमधील आहेत