शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मेरा शेर बेटा कहाँ गया... तिरंग्यात लपेटून मुलगा येताच आईने फोडला हंबरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 13:39 IST

केतन शर्मा यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मेरठ येथील राहत्या घरी पोहोचले.

लखनौ - जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी दोनहात करताना सैन्यातील मेजर केतन शर्मा यांना वीरगती प्राप्त झाली. उत्तर प्रदेशच्या मेरठचे सुपुत्र मेजर केतन शर्मा हे शहीद झाल्याची बातमी गावाकडे समजताच, कुटुंबासह गावभर शोककळा पसरली. 29 वर्षीय केतन शर्मा हे काही दिवसांपूर्वीच आपली सुट्टी संपवून सीमारेषवर कर्तव्यासाठी रुजू झाले होते. तर, सुट्टी संपवून परतत असताना, मी लवकरच घरी वापस येईन, असेही शर्मा म्हणाले होते. 

केतन शर्मा यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मेरठ येथील राहत्या घरी पोहोचले. यावेळी सैन्य दलातील अधिकारीही शर्मा कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले होते. तत्पूर्वी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मेजर केतन शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. केतन यांचे पार्थिव आपल्या घरी येताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. तर, केतन यांच्या आईने हंबरडा फोडला. मेरा शेर बेटा कहाँ है... असे म्हणत शहीद मेजर केतन यांच्या आईने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. यावेळी, सैन्यातील अधिकाऱ्यांनी केतन यांच्या आईंसह संपूर्ण कुटुंबियांचे सांत्वन केले. तीन वर्षीय चिमुकलीने बाप गमावला

केतन शर्मा यांचे पाच वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आई-वडिलांसह पत्नी ईरा आणि तीन वर्षाची चिमुकली कायरा असा परिवार आहे. तीन वर्षीय कायराला आपल्या घरी काय घडलंय? याचा लवलेशही नाही. सन 2012 मध्ये आयएमए डेहराडून येथून सैन्यात लेफ्टनंट बनले होते. त्यानंतर, केतन यांची पहिली पोस्टींग पुण्यात झाली. तर दोन वर्षांपूर्वीच त्यांना अनंतनाग येथे पाठविण्यात आले होते. 

 

टॅग्स :Martyrशहीदanantnag-pcअनंतनागJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी