शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Where is 2000 RS Notes: बाजारातून 2000 च्या नोटा कुठे गायब झाल्या; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 20:52 IST

2000 notes disappeared from the market circulation: संपलेल्या नोव्हेंबरमध्ये बाजारात 2000 रुपयांच्या नोटांची संख्या घटून 223.3 कोटी नोटा राहिल्या आहेत. हा आकडा सर्व मुल्याच्या नोटांपैकी फक्त 1.75 टक्के आहे.

नोटबंदी नंतर मोदी सरकारने जुन्या पाचशे, हजाराच्या नोटा बंद करून नव्या पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. काळा पैसा संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा तडकाफडकी निर्णय घेतला होता. हा काळा पैसा संपला की नाही हा मुद्दा वादातीत असला तरी आता बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मात्र गायब झाल्या आहेत. या नोटा कुठे गेल्या याचे उत्तर आज मोदी सरकारने राज्यसभेत दिले आहे. 

संपलेल्या नोव्हेंबरमध्ये बाजारात 2000 रुपयांच्या नोटांची संख्या घटून 223.3 कोटी नोटा राहिल्या आहेत. हा आकडा सर्व मुल्याच्या नोटांपैकी फक्त 1.75 टक्के आहे. मार्च 2018 मध्ये 2000 रुपयांच्या 336.3 कोटी नोटा चलनात होत्या. अर्थ मंत्रालयाचे राज्य मंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लिखित उत्तर दिले आहे. 

एखाद्या मुल्याच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय सरकारद्वारे रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्याने घेतला जातो. जनतेच्या व्यवहारांसंबंधी मागणीला सुविधाजनक बनविण्यासाठी या नोटा बाजारात उपलब्ध करणे ही जबाबदारी असते, असे ते म्हणाले.  "31 मार्च 2018 पर्यंत, 2,000 रुपयांच्या 336.3 कोटी नोटा (MPCs) चलनात होत्या, जे प्रमाण आणि मूल्याच्या संदर्भात NIC च्या अनुक्रमे 3.27 टक्के आणि 37.26 टक्के आहेत. याच्या उलट, 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत 2,233 MPC कार्यरत होते, जे प्रमाण आणि मूल्याच्या दृष्टीने NIC च्या अनुक्रमे 1.75 टक्के आणि 15.11 टक्के आहे.

नोटा कमी का झाल्या...चौधरी पुढे म्हणाले की, 2018-19 या वर्षापासून नोटांसाठी करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये नवीन ऑर्डर देण्यात आलेली नाही. "नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांच्या चलनात घट झाली कारण 2018-19 या वर्षापासून या नोटांच्या छपाईसाठी कोणताही नवीन इंडेंट ठेवण्यात आलेला नाही. याशिवाय, नोटाही खराब झाल्यामुळे त्या चलनातून बाद झाल्या आहेत. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक