शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा बूस्टर डोस कधी मिळणार ? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 12:44 IST

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी लसीकरणाच्या संथ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून देशातील बहुतांश लोकसंख्येला अजूनही लसीकरण झाले नाही, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून भारत कोरोना महामारीचा सामना करत आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण अद्याप सर्व लोकांचे लसीकरण झालेले नाही. यातच आता कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. या सर्व परिस्थितीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे. दुसरीकडे, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लसीकरणाच्या संथ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्येला अजूनही लसीकरण झालेले नाही, असे म्हटले आहे. तसेच, बूस्टर डोस कधी मिळणार असा प्रश्नही विचारला आहे. 

कोरोना रुग्णसंख्येत घटदेशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 6 हजार रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3 कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 4 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (22 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,317 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 318 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्णदिल्ली आणि महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडेवारी ही सर्वाधिक आहे. त्यामुळेच आता देशातील एकूण रुग्णसंख्या ही 213 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनचे जवळपास अर्ध्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे 57 तर महाराष्ट्रात 54 रुग्ण आहेत. आतापर्यंत 90 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीOmicron Variantओमायक्रॉन