शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर तुमचे होतेच कधी? राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 16:28 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावलेकाश्मीर पाकिस्तानचा भाग होतेच कधी?  पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे

लेह (लडाख) - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेले आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होतेच कधी? पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही, असे राजनाथ सिंह यांनी ठणकावले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज लडाखच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, येथे त्यांनी काश्मीरवरून पुन्हा एकादा पाकिस्तानला इशारा दिला. ते म्हणाले,''मी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेले आहे. मी पाकिस्तानला विचारू इच्छितो की, काश्मीर पाकिस्तानचा भाग होतेच कधी? ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी रडगाणे गात असता. पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही.'' पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे,असेही त्यांनी सुनावले.

यापुढे काश्मीरबाबत चर्चा झाली तर ती केवळ पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरबाबतच होईल. तसेच पीओकेच नाही तर गिलगिट-बाल्टिस्थान हासुद्धा भारताचाच भाग आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सुनावले.  ''काश्मीर प्रश्नाबाबत माझी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबतसुद्धा चर्चा झाली. त्यावेळी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी कलम 370 हटवणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे मान्य केले. आमचा शेजारी असेल्या पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. मात्र त्याआधी पाकिस्तानने भारताविरोधात सुरू असलेला दहशतवादाचा वापर बंद केला पाहिजे. जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादाचा वापर भारताला अस्थिर करण्यासाठी करण्यात येईल तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चा कशी काय करू शकतो,'' अशी विचारणाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केली. आता यापुढे पाकिस्तानशी चर्चा झालीच तर ती फक्त त्यांनी बळकावलेल्या काश्मीरसंबंधीच होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतेच हरियाणातील पंचकुला येथे ठणकावून सांगितले होते.  पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे बंद केल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा होणे शक्य नाही आणि जरी चर्चा झालीच तरी ती त्यांनी बळकावलेल्या काश्मीरखेरीज अन्य कोणत्याही विषयावर होणार नाही, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखPakistanपाकिस्तान