शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् विशाल ददलानीला मागावी लागली होती मुनी तरुण सागर यांची माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 14:04 IST

तरुण सागर यांच्या हरयाणा विधानसभेतील भाषणावर केली होती टीका

नवी दिल्ली: जैन मुनी तरुण सागर यांचं आज मध्यरात्री निधन झालं. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी त्यांच्या अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. आज मध्यरात्री तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ते त्यांच्या कडव्या विचारासांठी आणि परखड बोलण्यासाठी ओळखले जायचे. दोन वर्षांपूर्वी हरयाणाचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांनी तरुण सागर यांना विधानसभेत आमंत्रित केलं होतं. त्यावेळी तरुण सागर यांनी विधानसभेला संबोधित केलं होतं. जैन परंपरेनुसार, तरुण सागर कपड्यांशिवाय हरयाणाच्या विधानसभेत पोहोचले. यावरुन संगीतकार विशाल ददलानीनं ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती. 'जर तुम्ही अशा व्यक्तींना निवडून देत असाल, तर यासाठी तुम्हीच जबाबदार आहात,' असं ददलानीनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. नो अच्छे दिन जस्ट नो कच्छे दिन, असंही त्यानं ट्विटमध्ये म्हटलं होतं.विशाल ददलानीच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. यानंतर ददलानीनं तरुण सागर यांची भेट घेतली आणि कान धरुन त्यांची माफी मागितली. जैन धर्माच्या परंपरेनुसार अशाप्रकारे माफी मागितली जाते. आपल्या कडव्या प्रवचनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांचा जन्म 1967 मध्ये मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात झाला. त्यांचं मूळ नाव पवन कुमार जैन असं होतं. जैन मुनी होण्यासाठी त्यांनी 13 व्या वर्षी घरी सोडलं आणि 8 मार्च 1981 रोजी दिक्षा घेतली.  

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरVishal Dadlaniविशाल ददलानी