शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा शिक्षिकाच सांगते... मार ’त्या’ विद्यार्थ्याला थोबाडीत! देशभरात संताप; विरोधकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 02:02 IST

माहितीनुसार, गुरुवारी खुब्बारपूर गावातील शाळेत हा प्रकार घडला. त्रिप्ता त्यागी या शिक्षिकेने सदर विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून त्याच्याच वर्गमित्रांना कानफडात मारण्यास सांगितले.

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका शाळेतील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून, वादाला तोंड फुटले आहे. व्हिडीओमध्ये, एक शिक्षिका, एका विद्यार्थ्याला वर्गात सर्वांसमोर उभे करून त्याच्याच वर्गमित्रांना त्याच्या थोबाडीत मारायला सांगते. यावेळी ती विशिष्ट धर्माला उद्देशूनही आक्षेपार्ह विधान करते. 

माहितीनुसार, गुरुवारी खुब्बारपूर गावातील शाळेत हा प्रकार घडला. त्रिप्ता त्यागी या शिक्षिकेने सदर विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून त्याच्याच वर्गमित्रांना कानफडात मारण्यास सांगितले. व्हिडीओनुसार, ती एकामागून एक मुलांना बोलावून त्याला मारण्यास सांगते. एक मुलगा थोबाडीत मारून जातो तेव्हा ती, ‘काय मारतोय, जोरात मारना’ असं सांगते. रडणाऱ्या विद्यार्थ्याला बघून तिला अजिबात दया येत नाही, उलट ‘चला मारण्याचं आणखी कोण बाकी आहे. आता पाठीवर मारा. तोंडावर मारल्याने त्याचे गाल लाल होत आहेत’, असे म्हणते. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी सुरुवातीला तक्रार करण्यास नकार दिला होता, पण सोशल मीडियावर संताप वाढत गेल्यावर त्यांनी शनिवारी शिक्षिकेविरुद्ध एफआयआर दाखल केला.

ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर, अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते प्रकाश राज अशा सेलिब्रिटिंनीही शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिक्षिकेला तत्काळ निलंबित केले जाईल, अशी आशा असल्याची पोस्ट अख्तर यांनी केली.

विरोधकांचा हल्लाबोल ‘हे भाजपने पसरवलेले तेच पेट्रोल आहे, ज्याने भारताच्या कानाकोपऱ्यात आग लावली आहे’, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.“या घटनेला आदित्यनाथ आणि त्यांचे द्वेषपूर्ण विचार जबाबदार आहेत”, असे एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले. तर, याला भाजप-आरएसएसचे “द्वेषाचे राजकारण” जबाबदार आहे, ज्याने देशाला अशा स्थितीत आणले, अशी टीका समाजवादी पक्षाने केली.  

मी दिव्यांग म्हणून...तो गृहपाठ करत नव्हता. मी दिव्यांग आहे, उठता येत नसल्यामुळे २-३ विद्यार्थ्यांना त्याला मारण्यास सांगितले. तणाव वाढविण्यासाठी व्हायरल व्हिडीओसह छेडछाड केली असून, माझा तसा उद्देश नव्हता. तरी मी चूक केली आहे म्हणून मी हात जोडून माफी मागते.- त्रिप्ता त्यागी, आरोपी शिक्षिका

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश