नाशिकरोड प्रेसवर दहशतवादी हल्ला करतात तेव्हा़़़़
By admin | Updated: June 2, 2014 08:55 IST
पोलिसांचे मॉकड्रील : प्रतिबंध करण्याचे प्रशिक्षण
नाशिकरोड प्रेसवर दहशतवादी हल्ला करतात तेव्हा़़़़
पोलिसांचे मॉकड्रील : प्रतिबंध करण्याचे प्रशिक्षणनाशिकरोड : येथील करन्सी नोट प्रेस आणि भारत प्रतिभूती मुद्रणालय या महत्त्वपूर्ण ठिकाणी दहशतवादी हल्ला करतात आणि हा हल्ला सर्व सुरक्षा यंत्रणा मिळून यशस्वीपणे परतवून लावतात, असे दृश्य काल नाशिकरोडवासीयांना बघावयास मिळाले़ निमित्त होते, पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या मॉकड्रीलचे़भविष्यात खरोखर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास कशा प्रकारे सामना करावा यासाठी ही रंगीत तालीम होती़सकाळी ९ वाजता महत्त्वपूर्ण अशा करन्सी नोट प्रेस आणि भारत प्रतिभूती मुद्रणालय याठिकाणी काही दहशतवादी घुसल्याची बातमी सर्व सुरक्षा यंत्रणांना मिळते़ या बातमीनंतर सर्वच जण याठिकाणी पोहोचून या दहशतवाद्यांचा खात्मा करतात़ सकाळी ११़३० वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे अडीच तास हे मॉकड्रील सुरू होते़ या मॉकड्रीलमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, शहर पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक, दहशतवादविरोधी पथक, सीआयडी, इंटेलिजन्स ब्युरो, अग्निशामक दल यांनी सहभाग घेतला होता़ अचानकपणे जर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास त्यांचा सामना कसा करावा यासाठी हे मॉकड्रील करण्यात आले़ या मॉकड्रीलप्रसंगी मेनगेट व कोठाडी मार्ग हे रस्ते बंद करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)