शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अदानीप्रकरणी बोलताना विचार करून बोला; थेट शेअर बाजारावर परिणाम होताे; सेबीला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 11:00 IST

याचिकांमधून हिंडेनबर्ग अहवालावरून तपास करणे आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाॅर्ट सेलिंग गुंतवणूकदारांविराेधात गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :गौतम अदानी-हिंडेनबर्ग खटल्यातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. कोर्टाने म्हटले की, अदानी प्रकरणात जे काही युक्तिवाद केले जात आहेत, ते काळजीपूर्वक दिले पाहिजेत, कारण त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो. चौकशी समिती नेमण्याचा विचार करण्याचे संकेतही न्यायालयाने दिले आहेत. आता याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे.अदानीप्रकरणी गुंतवणूकदारांचे शाेषण केल्याप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि शेअर बाजार नियंत्रक ‘सेबी’ला नाेटीस बजावली असून, बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. ‘सेबी’चे अधिकार वाढविण्याबाबत एका समितीची स्थापना करण्याचा सल्ला न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला हाेणार आहे.सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमाेर त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी सेबीची बाजू मांडताना साॅलिसिटर जनरल यांनी सांगितले, की बाजार नियंत्रक आणि इतर संस्था आवश्यक कारवाई करीत आहेत. याचिकांमधून हिंडेनबर्ग अहवालावरून तपास करणे आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाॅर्ट सेलिंग गुंतवणूकदारांविराेधात गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. 

अमेरिकन कोर्टात देणार जोरदार लढा अमेरिकेतील शाॅर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालाचा माेठा फटका बसल्यानंतर उद्याेगपती गाैतम अदानी यांनी कायदेशीर लढ्यासाठी जाेरदार तयारी केली आहे. अदानी समूहाकडून अमेरिकेतील एक माेठी आणि महागडी कंपनी ‘वाॅचटेल’ या लाॅ फर्मची सेवा घेण्यात येणार आहे. वाॅचटेल ही कंपनी वादग्रस्त प्रकरणांत कायदेशीर लढाईसाठी ओळखली जाते. इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीच्या घोषणेपासून माघार घेतली होती. त्यावेळी ट्विटरने मस्क यांच्याविरोधातील न्यायालयीन लढ्यासाठी याच कंपनीची नियुक्ती केली होती.

मूडीजने दिला दणका...अदानी समूहातील कंपन्यांचे मूल्य माेठ्या प्रमाणात घटल्यानंतर मूडीजने समूहातील चार कंपन्यांचे रेटिंग ‘स्थिर’वरून ‘नकारात्मक’ केले आहे. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ग्रीन एनर्जी रिस्ट्रिक्टेड समूह, अदानी ट्रान्समिशन स्टेपवन आणि अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबई या कंपन्यांचे रेटिंग बदलले आहे. 

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीCourtन्यायालयshare marketशेअर बाजार