शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणीत आघाडीत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 05:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधी मोदींवर आक्रमक हल्ले चढवीत राहुल गांधी प्रकाशात आले आणि गेल्या काही दिवसांत ममता बॅनर्जी, मायावती व अखिलेश यादवांनीही साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.उत्तरप्रदेशात सप बसपची आघाडी भाजपला भुईसपाट करायला सरसावली आहे तर पाटण्यात काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीनंतर बिहारमधे लालूप्रसाद व काँग्रेस आघाडीला यंदा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. बंगालमधे सीबीआयच्या अतिउत्साही कारवाईला ‘बंगाल विरुद्ध दिल्ली’ असे स्वरूप देण्यात ममता यशस्वी झाल्या. बहुतांश विरोधी पक्ष त्यांच्या पाठिशी उभे राहिले. अशा नाट्यपूर्ण घटनामुळे यंदाची निवडणूक केवळ पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नसून त्रिशंकू लोकसभेची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी येणाºया विरोधी नेत्यांच्या चर्चेतून हाच सूर ऐकू येत आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत. मात्र आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एकूणच मोदी-शहा यांच्या जोडीला रालोआच्या घटक पक्षांना सांभाळता आले नसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीची संभावना ‘महाभेसळ’ अशी केली. मात्र एनडीएच्या घटक पक्षांना एकत्र ठेवण्यात तेही अपयशी ठरले आहेत. निवडणुकीला थोडे दिवस उरल्याने जुन्या मित्रपक्षांना जवळ आणण्यात भाजपाची दमछाक सुरू आहे.स्थिती चांगली नसल्याचा खासगीत खुलासा- भाजपाला २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा मिळाल्या तर सहयोगी पक्षांना ५४ जागा मिळाल्यामुळे एनडीएचे संख्याबळ ३३५ पर्यंत पोहोचले. यंदा एनडीएची स्थिती मजबूतनाही हे सत्ताधारी आघाडीचे खासदारही खासगीत सांगत आहेत.- एनडीएतून तेलगू देशम व कुशवाहांचा रालोसपा बाहेर पडले. शिवसेना, अकाली दल, अपना दल यांचेही भाजपाशी संबंध २0१४ इतके सौहार्दाचे राहिलेले नाहीत. गुरूद्वारा प्रकरणात हस्तक्षेपाबाबत अकाली दलाने अल्टिमेटम देत भाजपावर डोळे वटारले आहेत.- महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही ‘आम्हाला कोणाकडूनही जागांची भीक नको, पूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलोहोतो, यापुढेही लढायची तयारी आहे’, असे इशारे देत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९