शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

थ्रीडी इमेजिंगने गडकरी जेव्हा वाहन चालवतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 10:00 IST

Nitin Gadkari: नाशिक फाटा येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत दोन आधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी सिम्युलेटर बसविले असून, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी वाहन चालवण्याच्या आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ घेतला. डोळ्यावर थ्रीडी व्हीआर घालून प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. 

पिंपरी (पुणे) - नाशिक फाटा येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत दोन आधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी सिम्युलेटर बसविले असून, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी वाहन चालवण्याच्या आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ घेतला. डोळ्यावर थ्रीडी व्हीआर घालून प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) काम करते. नाशिक फाटा भोसरी रस्त्यावरील या संस्थेस गडकरी यांनी सकाळी ११ वाजता भेट दिली. सुरुवातीला भारत न्यू कार असेसमेंट कंट्रोल सेंटरला त्यांनी भेट दिली. त्यानंतर रस्ते वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना केलेल्या एका वाहनातून प्रवास केला. वाहनाचे सारथ्य सचिव संकेत भोंडवे यांनी केले. 

काय आहे उद्देश... देशातील सर्वाधिक अपघात मानवी चुकांमुळे होतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय त्यावर उपाययोजना करते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन आणि जनजागृती केली जाते.  अपघात रोखण्यासाठी चालकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी भोसरीतील केंद्रात दोन सिम्युलेटर बसविले आहेत.  चालकांना निरनिराळ्या वातावरणात, परिस्थितीत वाहन चालवताना येणारे अनुभव थ्रीडी इमेजिंगद्वारे घेता येणार आहेत.  एकाच मशीनवर विविध वाहनांचे प्रशिक्षण, तसेच दिवसा आणि रात्री वाहन चालविण्याचा अनुभव थ्रीडी इमेजिंगद्वारे मिळणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी