शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

केव्हा उघडलं जातं केदारनाथाचं द्वार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 10:47 IST

उत्तराखंड, हृषिकेशच्या कणाकणात भगवान शिवाचं अस्तित्व आहे. त्यामुळेच या राज्यात नजर जाईल तिथे शीव मंदिरं दृष्टिक्षेपास पडतात. पूर्ण हिमालय हे भगवान शिवाचं निवासस्थान आहे.

डेहराडून-  उत्तराखंड, हृषिकेशच्या कणाकणात भगवान शिवाचं अस्तित्व आहे. त्यामुळेच या राज्यात नजर जाईल तिथे शीव मंदिरं दृष्टिक्षेपास पडतात. पूर्ण हिमालय हे भगवान शिवाचं निवासस्थान आहे. भगवान भोलेनाथ सर्व भक्तांची मनोकामनाही पूर्ण करतात. त्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक केदारनाथ हे आहे. या मंदिराचे कपाट म्हणजे द्वार वर्षातील काही महिने बंद असते. ते आज सकाळी उघडले गेले. केदारनाथाच्या मंदिराचं कपाट म्हणजे द्वारे उघडणे आणि बंद होण्याच्या उत्सवाला डोली यात्रा संबोधलं जातं.जे लोक तीन दिवसांची पायी यात्रा करून या मंदिरात येतात त्यांची इच्छा भगवान शंकर पूर्ण करत असल्याची आख्यायिका सांगितली जाते. या देवस्थानाच्या द्वार बंद आणि उघडण्याच्या परंपरेचा संबंध हिमवृष्टीशी आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला द्वार बंद होते, तर उन्हाळ्यात उघडले जाते. भगवान आशुतोष यांच्या डोली यात्रेला पुण्याची यात्राही म्हटलं जातं. जी यात्रा केदारनाथाचं कपाट म्हणजेच द्वार बंद होणे आणि उघडण्याशी निगडित आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला केदारनाथ धाम बर्फानं आच्छादित होतं. ही वेळ देवाची पूजा करण्याची असते. याच दरम्यान भगवान आशुतोष प्रवासासाठी बाहेर पडतात. केदारनाथ यांची डोली 26 एप्रिलला ओंकारेश्वर मंदिरातल्या भैरव पूजेनं सुरू झाली. 26 एप्रिलला ओंकारेश्वर मंदिरापासून निघालेली केदारनाथाची डोली यात्रा सकाळी 10 वाजता पडाव फाट्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर 27 एप्रिलला डोली यात्रा गौरी कुंडाच्या जवळ दाखल झाली. 28 एप्रिलला शायंकाल पंचमुखी डोली यात्रा केदारनाथ मंदिरात पोहोचली असून, 29 एप्रिलला रविवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी केदारनाथ मंदिराचं कपाट म्हणजेच द्वार भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.कपाट उघडण्याच्या मुहूर्तावर भगवान शिवाची डोली ओंकारेश्वर मंदिरातून केदारनाथाला आणली जाते आणि कपाट बंद झाल्यानंतर ही डोली पुन्हा ओंकारेश्वर मंदिरात नेली जाते. भगवान केदारनाथाच्या दोन मूर्ती आहेत. एक भोग मूर्ती ही पुजा-यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येते आणि त्याची पूजासुद्धा केली जाते. तर दुसरी भगवान केदारनाथाची पंचमुखी उत्सव मूर्ती आहे. यात भगवान शिवाची सत्योजात, वामदेव, अघोर, ततपुरुष आणि इशान रूपी मुख आहे. या मूर्तीच्या मागच्या भागात शेषनाग विराजमान असल्याचं पाहायला मिळतं. तसेच डोक्यावर सुवर्णमुकुट बसवलं जातं. या दिवसांत केदारनाथमध्ये प्रसन्न वातावरण असतं. 2013नंतर केदारनाथमध्ये निर्माणाच्या कार्यानं वेग घेतला. प्रवाशांसाठीही सरकारनं चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भक्तांना दर्शनाबरोबरच पौराणिक कथाही सांगितल्या जातात.