शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात रक्ताची नाती दुरावतात तेव्हा...; जितेंदर सिंग शन्टी यांनी सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 15:17 IST

माजी आमदार, समाजसेवक जितेंदर सिंग शन्टी यांना समाज सेवेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली : माजी आमदार, समाजसेवक जितेंदर सिंग शन्टी यांना समाज सेवेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात शन्टी यांनी ज्याप्रकारे समाजसेवा केली, त्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले. पद्मश्रीने सन्मानित करण्यात आल्यानंतर शन्टी यांनी कोरोना काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी या काळात अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. 

२५ वर्षांपासून ॲम्ब्युलन्स चालविणारे शन्टी म्हणतात की, नात्यांवरचा विश्वास उडावा, असे अनुभव या काळात आले आहेत.  एका ठिकाणी दोन भाऊ मला म्हणत होते की, किती पैसे द्यायचे. मी विचारले, कशाचे पैसे. ही तर सेवा आहे. त्यावर एका भावाने वडिलांच्या खिशातून पैसे काढले आणि दुसऱ्या भावाकडे देत म्हणाला की, राहू दे आपल्याला.  मी असे अनेक जण बघितले, जे वडिलांच्या मृतदेहाला हातही लावत नव्हते. 

वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलांचा नकार 

एका कोट्यधीश व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मी ॲम्ब्युलन्स घेऊन त्यांच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो. दोन तासानंतरही काहीच हालचाल दिसली नाही, म्हणून मुलांना विचारले. तेव्हा मला असे समजले की, मुलांनी सेवा न केल्यामुळे त्यांच्या वडिलांनी सर्व संपत्ती सेवाभावी संस्थांना दान केली आहे. त्यावर आता मुलांचे असे म्हणणे होते की, आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही. त्या संस्थांनीच करावेत. हे समजल्यावर मी पुढे आलो आणि अंत्यसंस्कार केले. अपघातानंतर मृत समजून एका व्यक्तीला कोणीच हात लावत नव्हते. मी तेथून जात होतो. त्या व्यक्तीला मी दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्याचे प्राण वाचले, हा प्रसंग सांगताना, अपघातातील जखमींना मदतीसाठी कोणी पुढे येत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार