शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

...म्हणून प्ले स्टोरवरुन पतंजलीचं किंभो अॅप हटवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 14:47 IST

रामदेव बाबांच्या पतंजलीनं कालच अॅप लॉन्च केलं होतं

मुंबई: रामदेव बाबांच्या पतंजलीनं काल किंभो हे मेसेजिंग अॅप लॉन्च केलं होतं. एका दिवसात जवळपास 50 हजार जणांनी हे अॅप डाऊनलोड केलं होतं. मात्र आता हे अॅप गुगलच्या प्ले स्टोरवरुन हटवण्यात आलंय. किंभो अॅप डाऊनलोड केल्यानंतर अनेकांनी मोबाईन हँग होत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे हे अॅप प्ले स्टोरवरुन काढून टाकण्यात आलं. मात्र ज्या व्यक्तींनी किंभो अॅप डाऊनलोड केलं होतं, त्यांना प्ले स्टोरवर अजूनही हे अॅप दिसतंय. आता गुगल प्ले स्टोरवर किंभो अॅप सर्च केल्यास ते दिसत नाही. मात्र किंभो नावाचं एक दुसरं अॅप प्ले स्टोरवर दिसतं. ज्यांनी हे अॅप डाऊनलोड केलंय, त्यांच्या फोनवर किंभो अॅप दिसतं. ज्या लोकांनी हे अॅप डाऊनलोड करुन अनइन्स्टॉल केलंय, त्यांच्या फोनमध्येही हे अॅप दिसतंय. पतंजलीच्या अॅपमध्ये स्क्रिनवर चॅट्स, कॉन्टॅक्ट्स आणि अॅक्टिव्हिटी असे तीन टॅब देण्यात आले होते. सर्वात वर उजव्या बाजूला गियर आयकॉनमध्ये प्रोफाईल एडिट करण्याचा पर्याय देण्यात आला होता. याशिवाय सर्चमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट पाहण्याची सुविधा देण्यात आली होती. अॅपच्या प्रोफाईल पेजवर जाऊन एडिट प्रोफाईलवर जाऊन नाव आणि फोटो बदलण्याचा पर्याय देण्यात आला होता. याशिवाय फोन नंबर बदलण्याचा पर्यायही दिला गेला होता.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली