शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
3
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
4
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
5
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
6
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
7
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
8
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
9
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
10
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
11
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
12
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
13
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
14
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
15
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
16
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
17
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
19
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
20
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:28 IST

भारताने ऑपरेशन सिंदूर करून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. या लष्करी कारवाईनंतर आता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' करून पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर आता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना या मोहिमेची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' केले. या मोहिमेत, भारतीय सैन्याने, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. 

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पोस्ट करून सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची माहिती दिली आहे. आज सकाळी ११ वाजता ही सर्वपक्षीय बैठक संसद पुस्तकालय भवन, संसद परिसर समिती कक्ष जी-०७४मध्ये पार पडणार आहे. या बैठकीत सरकारच्यावतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू सामील होतील. राजनाथ सिंह हे या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. या बैठकीत सर्व पक्षांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जाईल. तसेच, पुढे भविष्यात आणखी काय पावले उचलली जातील, याच्या रणनीतीवर देखील या बैठकीत चर्चा होईल.

पंतप्रधानांनी बैठकीला उपस्थित राहावे!ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या बैठकीला उपस्थित असायला हवे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली. 

"पंतप्रधानांनी बैठकीला उपस्थित राहावे अशी आमची इच्छा आहे. पंतप्रधान सगळ्या विरोधी पक्षांशी चर्चा करत आहेत, असा संदेश गेला पाहिजे. जेव्हा देश एका आवाजात बोलेले, तेव्हा जगाला ऐकावेच लागेल. पाकिस्तान पूंछमध्ये निष्पाप लोकांवर हल्ला करत आहे. गुरुद्वारावर हल्ला करत आहे. हा दोन्ही देशांमधील फरक आहे. आपण दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करत आहोत आणि पाकिस्तान आपल्या निष्पाप लोकांवर हल्ला करत आहे", असे कॉँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक