शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Parliament: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर मोदी सरकार जुन्या संसदेचं काय करणार? अशी माहिती येतेय समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 11:07 IST

Old Parliament House: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत असतानाच अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या जुन्या संसद भवनाचं काय होणार हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे.

२८ मे २०२३ हा दिवस भारतीयसंसदीय इतिहासामध्ये ऐतिहासिक ठरणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवनिर्मित भवनाचं उद्घाटन करणार आहेत. २०१९ मध्ये लोकसभा आणि राज्यसभेने नवे संसद भवन बांधण्याबाबत सरकारकडे आग्रह केला होता. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या भवनाची पायाभरणी केली होती. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत असतानाच अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या जुन्या संसद भवनाचं काय होणार हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे.

लोकसभा सचिवालयाकडून संसद भवनाबाबत तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेनुसार नव्या संसदेच्या उद्घाटनानंतरही जुन्या संसदेच्या इमारतीचा वापर सुरू राहील. तसेच दोन्ही इमारती एकमेकांना पुरक म्हणून काम करतील. सन २०२१ च्या मार्च महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर जुन्या संसदेची दुरुस्ती केली जाईल. त्याचा वापर संसदेशी संबंधित कार्यक्रमांच्या आयोजनासाठी केला जाईल. जुने संसद भवन हे देशातील सर्वात मोठ्या वास्तूंपैकी एक आहे. त्याचं बांधकाम प्रसिद्ध वास्तुकार सर एडविन लुटियन्स आणि सर हरबर्ट बेकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आलं होतं. या वास्तूचं उदघाटन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन याने १८ जानेवारी १९२७ रोजी केलं होतं. त्यावेळी त्याच्या बांधकामासाठी ८३ लाख रुपये खर्च झाले होते.

आता नव्याने बांधलेले संसद भवनही तितकेच भव्य आणि अत्याधुनिक सोईसुविधांनी सज्ज आहे. या संसद भवनामधील लोकसभेमध्ये ८८८ आणि राज्यसभेत ३८४ सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था असेल. तर संयुक्त अधिवेशनावेळी १२७२ सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था असेल. नव्या संसद भवनामध्ये लोकसभेला राष्ट्रीय पक्षी मोराच्या आकारामध्ये तर राज्यसभेला राष्ट्रीय फूल कमळाच्या आकारामध्ये आणि भूकंपरोधी डिझाईनमध्ये तयार करण्यात आलं आहे.    

टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार