बिहारचे माजी मंत्री राष्ट्रीय जनता दलाचे आमदार तेज प्रताप यादव यांची एका महिलेबरोबर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, वडील लालू प्रसाद यादव यांनी त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. सोशल मीडियावर पोस्ट करून लालू यांनी ही माहिती दिली. दरम्यान, आता तोज प्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी माध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी तेजप्रताप यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर आरोप केले. ऐश्वर्या राय म्हणाल्या, आम्हाला माध्यमांकडून सर्व काही कळले. घटस्फोटाची माहिती आम्हाला आधी माध्यमांकडून मिळाली.
ऑपरेशन सिंदूर इफेक्ट...! आता खुद्द इस्रायल भारताकडून खरेदी करणार शस्त्रास्त्रे, झाला मोठा करार
ऐश्वर्या म्हणाल्या, 'हे सर्व लोक यात सामील आहेत. हे निवडणुकीमुळे घडले आहे. संपूर्ण कुटुंब नाटक करत आहे. आम्हाला याबद्दल माध्यमांकडून कळले. माझं आयुष्य उध्वस्त करण्याची काय गरज होती हे त्यांना विचारा. त्यांना विचारा माझे काय होईल. संपूर्ण कुटुंब नाटक करत आहे, असंही त्या म्हणाल्या.
ऐश्वर्या म्हणाल्या, 'हे सर्व लोक यात सामील आहेत.' ते काल रात्रीही भेटले असतील. हे सर्व निवडणुकांमुळे घडत आहे. आम्हाला सर्व माहिती माध्यमांकडून मिळते.'मला काहीच माहित नाही, आम्हाला मारले तेव्हा त्यांचा सामाजिक न्याय कुठे गेला होता ते त्यांना विचारा. त्यांना विचारा माझे काय होईल?, असा सवालही त्यांनी केला.
माझा न्याय कुठे गेला?
माध्यामांसोबत कायदेशीर कारवाईच्या प्रश्नावर ऐश्वर्या म्हणाल्या, 'आपण याबद्दल नंतर बोलू.' तुम्ही सात वर्षापासून पाहत आहात. आम्ही सगळं करत आहोत. तो म्हणाला १२ वर्षे झाली. लालूजी, राबरी जी, तेजस्वी, सर्वांना हे आधीच माहित असेल. माझा न्याय कुठे गेला? आपण आधीच लढत आहोत. आपण पुढेही लढू, असंही त्या म्हणाल्या.
तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या मैत्रिणीचा फोटो शेअर केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून काढून टाकले आणि कुटुंबातूनही बेदखल केले.