शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

क्या कहूँ, हैरान हूँ, शर्मसार हूँ - योगेंद्र यादवांचे हताश उद्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 20:53 IST

राज्यसभेच्या तीन जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांत आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे आम आदमी पक्षावर पक्षाचे आजी माजी कार्यकर्ते, नेते टीका करत आहेत. 

नवी दिल्ली- राज्यसभेच्या तीन जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांत आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे आम आदमी पक्षावर पक्षाचे आजी माजी कार्यकर्ते, नेते टीका करत आहेत. आपने संजय सिंह यांंच्याबरोबर एन. डी. गुप्ता आणि सुशील गुप्ता यांची उमेदवारीसाठी निवड केली आहे.कुमार विश्वास यांनी उपरोधिक शैलीत केजरीवाल आणि त्यांच्या टीमवर टीका केली तर ट्विटरवर आपचे माजी नेते आणि मार्गदर्शक प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. तसेच मयांक गांधी यांनीही आप आणि बसपामध्ये काहीच फरक राहिलेला नाही, अशा हताश भावना व्यक्त करणारे ट्विट केले आहे.आपल्या ट्विटमध्ये योगेंद्र यादव म्हणतात, "अरविंदचे कितीही दोष असतील पण त्याला कोणीही विकत घेऊ शकत नाही, असं गेल्या तीन वर्षांपासून मी अनेकांना सांगितलंय, म्हणूनच मी कपिल शर्मा यांनी केलेले आरोप फेटाळले, पण आज काय बोलायचं तेच कळत नाही, मी हैराण झालोय, मलाच लाज वाटू लागली आहे."यादव यांच्याबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ आणि आपचे माजी नेते प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटमधून आपने राज्यसभेसाठी निवड केलेल्या उमेदवारांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ज्या लोकांनी सार्वजनिक जीवनाशी फारकत घेतलेली नाही अशांची निवड आपने केली आहे, तसेच राज्यसभेत जावे असा कोणताही अनुभव त्यांना नाही. आपने कार्यकर्त्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष केले आहे, अशा शब्दांमध्ये प्रशांत भूषण यांनी आपवर फटकारे ओढले आहेत.मयांक गांधी ट्विटमध्ये म्हणतात, " सुशील गुप्तांची राज्यसभेसाठी का निवड केली असावी ? आप आणि बसपामध्ये काहीही फरक राहिलेला नाही, आप हा भ्रष्ट पक्ष झाला आहे यात शंका नाही. जातीयवाद आणि जातींच्या व्होटबँकेनंतर आपण भ्रष्टाचाराचा शेवटचा बालेकिल्लाही सर केला आहे."या सगळ्या नेत्यांनी आपवर तोंडसुख घेतल्यावर पक्षाचे माजी सदस्य कपिल मिश्रा स्वस्थ बसते तरच नवल. त्यांनीही उपरोधिक ट्विट करून आपच्या निर्णयावर जबरदस्त टीका केली आहे. सुशील गुप्तांचे वर्णन त्यांनी " केजरीवाल प्रमाणित, महान समाजसेवी" असे करून गुप्ता यांचे एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. 

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवAAPआप