शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

जनसेवेसाठी धर्मांतर करण्याची गरज काय?

By admin | Updated: March 24, 2015 02:14 IST

अल्पसंख्यकांच्या संपूर्ण संरक्षणाची ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज व्यक्त केली.

नवी दिल्ली : अल्पसंख्यकांच्या संपूर्ण संरक्षणाची ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज व्यक्त केली. धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याशिवाय लोकांची सेवा करता येणार नाही का, असा सवालही त्यांनी केला. राज्य अल्पसंख्यक आयोगाच्या संमेलनात राजनाथ बोलत होते. ‘घर वापसी’ आणि धर्मांतराबाबत कधी कधी अफवा पसरतात व वाद निर्माण होतात. कुठल्याही प्रकारच्या धर्मांतराची गरजच काय? सेवा करायची असेल तर त्यांचा धर्म न बदलताही ती केली जाऊ शकते. लोकांनी त्यांचा धर्म बदलावा, म्हणून सेवा केली जाते का? धर्मांतराचा मुद्दा संसदेतही उपस्थित झाला होता. सरकारने या मुद्यावर काहीतरी करावे, असे विचार अनेकांनी मांडले होते; मात्र माझ्या मते, यात समाजाचीही भूमिका आहे. परस्परांच्या श्रद्धेचा आदर करून आपण जगू शकत नाही का, असे अनेक सवाल राजनाथसिंग यांनी यावेळी केले.संघ परिवाराने धर्मांतराच्या मुद्यावर ख्रिश्चनांवर हल्ले चालवले असताना, राजनाथसिंग यांचे हे वक्तव्य आले आहे. मदर टेरेसांच्या सेवाभावी कार्यामागे धर्मांतराचा उद्देश असल्याची टीका अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)४लखनौ/जयपूर : केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील सांप्रदायिक वातावरण बिघडले आहे. मुस्लिमच नव्हे, तर ख्रिश्चनही या वातावरणात स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत, अशा आशयाचा ठराव आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने रविवारी पारित केला.४देशातील मुस्लिमांची सर्वोच्च संस्था असलेल्या आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या १२४ व्या अधिवेशनात हा ठराव पारित करण्यात आला. देशातील हिंदुत्ववादी शक्ती ‘विष’ ओकत आहेत. केवळ मुस्लिमच नाहीत, तर ख्रिश्चनही स्वत:ला असुरक्षित समजत आहेत, असे या ठरावात म्हटले आहे. बोर्डाचे सह महासचिव मोहंमद अब्दुल रहीम कुरैशी यांनी याबाबत माहिती दिली. ४मी सर्व राज्य सरकारांना अल्पसंख्यकांच्या संरक्षणासाठी यथाशक्ती ठोस पावले उचलण्याची विनंती करतो. मी व माझे सरकार अल्पसंख्यकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत. परमेश्वराच्या शपथेपूर्वक मी हे सांगू इच्छितो, अशी ग्वाही राजनाथसिंग यांनी यावेळी दिली.