शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

तिसरी लाट थोपविण्यासाठी कोणते उपाय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 06:16 IST

सुप्रीम काेर्टाने केंद्राकडून मागविला तपशील

नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यावेळी लहान मुलांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊ शकतो. हे लक्षात घेता तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी काय पूर्वतयारी केली आहे, याचा तपशील केंद्र सरकारने सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

लहान मुलांपासून सर्वच वयोगटातील लोकांचे लसीकरण अधिक संख्येने व्हावे, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली पाहिजेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्या. एम.आर. शहा यांनी सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट येणार असे गृहीत धरून तिचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला लस देण्याकरिता आतापासूनच शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दिल्लीला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केल्यास त्याचा अन्य राज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाचे सॉलिसिटर जनरल तुषार म्हणाले.

कधी येणार तिसरी लाट?देशात कोरोनाची तिसरी लाट हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या प्रारंभी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील जास्तीत जास्त लोकांचे दिवाळीपूर्वी लसीकरण होणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत युवकांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे.       - डॉ. गिरीश बाबू, साथरोगतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, बंगळुरू  

लहान मुलांना लस देण्याची योजना आखा

n तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधित झालेलं लहान मूल जेव्हा उपचारासाठी रुग्णालयात जाईल, तेव्हा त्याच्या आईवडिलांनाही त्याच्यासोबत जावे लागेल. n लहान मुलांनाही लस देण्यासंदर्भात आता केंद्र सरकारने योजना आखायला हवी. त्याची पूर्वतयारी आतापासूनच केली तर भविष्यात कोरोनाशी अधिक प्रभावीपणे मुकाबला करता येईल. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय