शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाची काय परिस्थिती? निकाल आला, सपाचा उमेदवार जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 16:46 IST

Faizabad lok sabha result 2024: उत्तर प्रदेशसह देशभरात राम मंदिरावरून वातावरण फिरविण्याची तयारी भाजपाने केली होती. त्याच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे.

मोदी सरकारने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्धवट बांधकाम झालेल्या राम मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. उत्तर प्रदेशसह देशभरात राम मंदिरावरून वातावरण फिरविण्याची तयारी भाजपाने केली होती. त्याच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. सपा-काँग्रेसच्या जवळपास ४१ जागा आघाडीवर आहेत. तर भाजपा ३५ जागांवर आघाडीवर आहे. अशातच ज्या राम मंदिरवरून भाजपाने हवा केली होती त्या अयोध्येच्या लोकसभा मतदारसंघात काय झाले, याची उत्सुकता देशभरातील जनतेला लागून राहिली होती. 

राम मंदिर असलेल्या अयोध्येमध्ये म्हणजेच फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार सुमारे 45 हजार मतांनी पराभूत झाला आहे. या मतदारसंघात एखाद दुसरी फेरी वगळता सपाचे अवधेस प्रसाद आघाडीवर होते. भाजपाचे लल्लू सिंह काही मतांनी आघाडीवर आले होते. आता हे अंतर एवढे वाढत गेले की लल्लू सिंह यांचा पराभव निश्चित झाला आहे. 

या मतदारसंघात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान झाले होते. लल्लू सिंह यांना 357414 मते मिळाली आहेत. तर अवधेश प्रसाद यांना 382267 मते मिळाली आहेत. भाजपा आणि सपा मधील उमेदवाराचे मतांचे अंतर ४५ हजार पेक्षा जास्त मतांचे झाले आहे. २०१४, २०१९ मध्ये लल्लू स‍िंह जिंकले होते. त्यांनाच भाजपाने पुन्हा तिकीट दिले होते.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४faizabad-pcफैजाबादRam Mandirराम मंदिर