शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अदानींच्या २० हजार कोटी रुपयांचं नेमकं प्रकरण काय? ज्यावरून राहुल गांधी नरेंद्र मोदींना करताहेत लक्ष्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 23:53 IST

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही काळापासून उद्योगपती गौतम अदानींशी असलेल्या संबंधांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य केले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही काळापासून उद्योगपती गौतम अदानींशी असलेल्या संबंधांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य केले आहे. दरम्यान, गेल्या शनिवारी राहुल गांधी यांनी अदानींवर गंभीर आरोप केला होता. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटींची रक्कम ही अदानी ग्रुपमध्ये गुंतवण्यात आली, यामधील काही भारताच्या संरक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. 

राहुल गांधी यांनी हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्राशी जोडलं आहे. अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये अचानक २० हजार कोटी रुपये कुठून आले. हा पैसा कुणाचा होता, यामधील काही संरक्षण क्षेत्रातील कंपन्याही आहेत. संरक्षण मंत्रालय त्यावरून प्रश्न का विचारत नाही आहे, असा सवाल त्यांनी विचारला. राहुल गांधी यांनी या प्रकरणामध्ये एका चिनी नागरिकाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले की, हा चिनी नागरिक कोण आहे, त्याबाबत प्रश्न का विचारले जात नाही आहेत, चीनच्या याच नागरिकाचा ऊल्लेख आधी हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हा नागरिक तैवानमध्ये अदानी ग्रुपचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  

राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत त्यांना या शेल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची माहिती कुठे मिळाली, याबाबत काहीही सांगितले नाही. मात्र त्यांनी केलेले आरोप हे हल्लीच फायनान्शियल टाइम्समध्ये छापलेल्या एका रिपोर्टशी मिळते जुळते आहेत.  

या आरोपांबाबतच्या पुराव्यांबाबत विचारले असता काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी राहुल गांधींनी जे आरोप केले आहेत. त्याचे पुरेसे पुरावे पक्षाकडे आहेत, असे सांगितले. जेव्हा सरकार या आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी कऱण्यास तयार होईल, तेव्हा हे पुरावे या समितीसमोर सादर केले जातील, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGautam Adaniगौतम अदानीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा