शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर ४ वर्षात काय बदललं?, भाजपकडून व्हिडिओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 15:15 IST

मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला आता ४ वर्षे झाली आहेत

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा असलेलं कलम ३७० हटवण्याच्या निर्णय घेतला. देशाच्या स्वातंत्र्यापासून काश्मीर राज्याला असलेले काही विशेषाधिकार या कलमान्वये काढून घेण्यात आले. मोदी सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. मात्र, संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लावून आणि कुठेही अनुचित प्रकार न घडता कलम ३७० हटविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. आता, गेल्या ४ वर्षात काश्मीरमध्ये नेमकं काय बदललंय, याची माहितीच भाजपने व्हिडिओच्या माध्यमातून दिलीय. 

मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला आता ४ वर्षे झाली आहेत. त्यामुळे, या निर्णयाचा तेथील जनसामान्यांवर आणि देशावर काय परिणाम झाला, याची चर्चाही नेहमीच होत असते. यासंदर्भात भाजपने एक् व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, या निर्णयामुळे काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली असून विकासाने गती पकडल्याचं म्हटलं आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पार पडत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे, असे या व्हिडिओतून सांगण्यात आलंय. 

या निर्णयामुळे काश्मीरसाठी वेगळा झेंडा आणि वेगळे कायदे रद्द झाले. काश्मीरच्या नागरिकांचं दुहेरी नागरिकत्व संपुष्टात आलं आणि जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना मिळाला. या ४ वर्षांत काश्मीरमधल्या दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आणि दहशतवाद्यांच्या कारवायादेखिल कमी झाल्या आहेत. याशिवाय काश्मिरी नागरिक भारतीयांच्या आणखी जवळ आले. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला ४ वर्षे पूर्ण झाले असून भाजपने व्हिडिओच्या माध्यमातून याची माहिती दिली. गेल्या ४ वर्षात काश्मीरचं नशिब आणि चित्र बदललंय. काश्मीरमध्ये आता शाळा बंद आणि आंदोलनं इतिहास जमा झालं आहे. घुसकोरी करण्याची हिंमत आता दशतवाद्यांमध्ये राहिली नाही. कलम ३७० हटताच ९०० केंद्रीय कायदे काश्मीरमध्ये लागू करण्यात आले. तसेच, ५७,५०० कोटी रुपयांच्या विकास कामांना गती मिळाली आहे. चेनाना-नाशरी या देशातील सर्वात मोठा हायवे बोगदा येथे बनला आहे. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेस वे काश्मीरची ओळख बनलीय. तसेच, चिनाब ब्रीज हा जगातील सर्वात उंच पुलही याच खोऱ्यात बांधून पूर्ण झाला आहे, अशी माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी